Reserve Bank : जागतिक संकटाच्या काळातही रिझर्व्ह बँकेकडून रेपोदर जैसे थे
पहिल्या तिमाहीच्या जीडीपी वाढीच्या अंदाजातही प्रगती
08-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Reserve Bank) आर्थिक वर्ष २०२७ साठी आयोजित केलेल्या पहिल्या द्विमासिक पतधोरण बैठकीमध्ये, रिझर्व्ह बँकेने रेपोदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीच्या या बैठकीचे आयोजन दि. 6 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात आले होते. बुधवार दि. 8 एप्रिल रोजी बैठकीच्या शेवटच्या दिवशी रेपो दराबाबतचा निर्णय घेण्यात आला.(Reserve Bank)
या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) रेपो दरामध्ये कपात न करता, रेपो दर 5.25 टक्क्यावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाकडे धोरणात्मक तटस्थता म्हणून पाहिले जात असून, यापूर्वी 2025 मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये 125 अंकाची कपात केली होती.(Reserve Bank)
जागतिक संकट काळामध्ये अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना या संकटाची झळ बसली असताना, भारतीय अर्थव्यवस्थेला या संकटाचा फटका बसू नये म्हणून रिझर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थे ठेवून दिलासा दिला आहे.(Reserve Bank)
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) आर्थिक वर्ष 2027 मध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहण्याचा अंदाज वक्त केला असून, आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.7% वरून 6.9% पर्यंत वाढवला आहे. तर, जागतिक संकताच्या काळातही दुसर्या तिमाहीसाठी भारतीत अर्थव्यवस्था 6.8% वरून 7% पर्यंत प्रगती करेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. तसेच, महागाईवर भाष्य करताना रिझर्व्ह बँकेने देशात पहिल्या तिमाहीसाठीचा अंदाज 4 टक्के व्यक्त केला असून, दुसर्या तिमाहीसाठी तो 4.2 टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.(Reserve Bank)
रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) एल निनोबाबत धोका व्यक्त करताना, हा महागाईसाठी कारक ठरु शकतो असे म्हटले आहे. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते; ज्याचा परिणाम शेतीवर होतो. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्चावर होऊ शकतो, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.(Reserve Bank)