Navnath Ban : स्वतःचा पक्ष सांभाळण्यास अपयशी राऊत आंतरराष्ट्रीय विषयावर भाष्य करत आहेत - नवनाथ बन
08-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) "स्वतःचा पक्ष सावरण्यात अपयशी ठरलेले राऊत आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य करत आहेत. इराण-इस्रायल संघर्षासारख्या संवेदनशील विषयांवर भारताची भूमिका ठरवण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सक्षमपणे पार पाडली जात आहे. जगभरात तणाव असतानाही भारत सुरक्षित ठेवण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले असून, राऊतांनी अनावश्यक वक्तव्ये करण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे."असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर बुधवार दि.८ रोजी टीका करताना केले.(Navnath Ban)
" देशहितापेक्षा विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका राऊत यांनी स्वीकारली असून, हीच त्यांची राजकीय पद्धत बनली आहे. अशा भूमिकेमुळे जनतेमध्ये त्यांची प्रतिमा घसरली असून, लोकांनी त्यांना वारंवार नाकारल्याचे समोर आले आहे."असे बन यांनी स्पष्ट केले.(Navnath Ban)
बन यांनी सांगितले की," पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर ४००-५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत आणि सामान्य नागरिक अडचणीत आहेत. अशा देशाचे कौतुक संजय राऊत करत आहेत.भारतात मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आर्थिक स्थैर्य राखले गेले आहे." असे बन (Navnath Ban) यांनी नमूद केले.
नवनाथ बन (Navnath Ban) यांनी आरोप केला की ,"संजय राऊत विविध नेत्यांमध्ये ‘ऑपरेटर’ म्हणून काम करत आहेत. स्वतःची भूमिका स्पष्ट न मांडता मध्यस्थी आणि दलालीचे राजकारण करण्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे."
बन यांनी प्रश्न उपस्थित केला की, "बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई होत असताना संजय राऊत का विरोध करत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी ही कारवाई आवश्यक आहे." बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत सांगितले की," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या भावनांना समजून घेणारे नेतृत्व आहे. त्यामुळेच त्यांना मोठा जनाधार मिळतो."(Navnath Ban)
बन यांनी आरोप केला की ,"संजय राऊत काँग्रेसकडे झुकत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसत आहे.एडीआर प्रक्रियेबाबत चुकीची माहिती देऊन संजय राऊत जनतेची दिशाभूल करत आहेत. चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल."(Navnath Ban)
नवनाथ बन यांनी सांगितले की, "पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत.ओला-उबरसारख्या सेवांमधील कामगारांची नोंदणी आणि पडताळणी करण्याच्या निर्णयाचे स्वागत असून. कामगारांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे."(Navnath Ban)