चंद्राच्या नजरेतून कशी दिसते पृथ्वी? सूर्यग्रहण, आकाशगंगा अन् कधीही न पाहिलेला चंद्र...; Artemis 2 च्या अंतराळवीरांनी अनुभवलं अनोखं विश्व!

    08-Apr-2026   
Total Views |

NASA Artemis 2 Mission Moon

NASA Artemis 2 Mission Moon :
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने ऐतिहासिक ‘आर्टेमिस २’ (Artemis II) मोहिमेअंतर्गत चंद्राची प्रदक्षिणा करणाऱ्या अंतराळवीरांनी टिपलेली पहिली अधिकृत छायाचित्रे जगासमोर आणली आहेत. चंद्राच्या अत्यंत जवळून प्रवास करताना अंतराळवीरांना दिसलेली ही दृश्ये मानवी कल्पनाशक्तीला थक्क करणारी असून, अंतराळ संशोधनातील एका सुवर्ण अध्यायाची साक्ष देत आहेत.

अंतराळातून अनुभवलं सूर्यग्रहण

solar eclipse

तब्बल ५४ मिनिटांचं सूर्यग्रहण या मोहिमेत अंतराळवीरांनी पाहिलं जेव्हा चंद्रानं सूर्याला पूर्णपणे झाकोळलं होतं.

solar eclipse

ओरायन यानाच्या सोलार ॲरे विंग्स (Solar Array Wings) भागावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी, सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या प्रकाशात उजळून निघालेला चंद्र टिपला. त्यावेळची ही छायाचित्रे...


कधीही न पाहिलेला चंद्र!

craters

चांद्रप्रदक्षिणेदरम्यान चंद्राच्या अगदी जवळून जाताना आर्टेमिस II च्या चमूने ओरिएंटेल बेसिनच्या कड्यांचे (rings) हे अप्रतिम छायाचित्र टिपले. यात दिसणारी दोन लहान विवरे (craters) ज्यांना 'Integrity' आणि 'Carroll' अशी नावे द्यावीत, असे आर्टेमिस II च्या चमूने सुचवले आहे. ओरायन यान चंद्रापासून केवळ 6,545 किलोमीटर अंतरावर असताना ही छायाचित्रे घेण्यात आली. या अनोख्या दृष्टिकोनातून चंद्राचे यापूर्वी कधीही न पाहिलेले रुप टिपले गेले.


कशी दिसते मावळती अन् उगवती पृथ्वी?

Moon

आर्टेमिस II मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी फक्त चंद्राचीच नवी बाजू नव्हे तर, तिथून दिसणारी 'मावळती पृथ्वी' (Earthset) सुद्धा पाहिली. चंद्र प्रदक्षिणेदरम्यान ही दृश्य टिपले गेली.

चंद्र असाही दिसतो... चंद्र कधी इतका जवळून पाहिला होता का?

Moon


ताऱ्यांनी भरलेले आकाश

Moon
 
पृथ्वीच्या दिशेनं मार्गस्थ होण्यापूर्वी आपल्या आकाशगंगेचे आर्टेमिस II च्या अंतराळवीरांनी टिपलेले हे चित्तथरारक छायाचित्र.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\