Mallikarjun Kharge : राजकारणात 'कुराण'चा संदर्भ खर्गेंच्या अंगलट; तक्रार दाखल!

रा.स्व.संघाकडून कायदेशीर कारवाईची मागणी

    08-Apr-2026   
Total Views |
Mallikarjun Kharge
 
मुंबई : (Mallikarjun Kharge) काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दक्षिण आसाममध्ये आयोजित निवडणूक सभेदरम्यान केलेल्या कथित अपमानास्पद, भडकावू आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील वक्तव्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तर आसाम प्रांत व दक्षिण आसाम प्रांत घटकांनी कायदेशीर कारवाईची मागणी करत अनुक्रमे दिसपूर पोलीस ठाणे आणि सिलचर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रारी दाखल केल्या आहेत.(Mallikarjun Kharge)
 
तक्रारीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी श्रीभूमी जिल्ह्यातील करीमगंज दक्षिण विधानसभा क्षेत्रातील नीलामबाजार येथे आयोजित निवडणूक सभेत वादग्रस्त विधान केले. त्यांनी संघ आणि भाजपा यांच्या विचारसरणीची तुलना विषारी सापाशी करत त्यांचा नायनाट करण्याचे आवाहन केल्याचा आरोप आहे. मल्लिकार्जुन खर्गेंच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत संघाने तीव्र चिंता व्यक्त केली असून, अशा प्रकारची भाषा निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक भावनांचा वापर करून संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात वैर, भीती आणि हिंसाचार भडकवू शकते, असे म्हटले आहे.(Mallikarjun Kharge)
 
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, हा प्रकार जनप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम ८३ अंतर्गत भ्रष्ट निवडणूक आचरणात मोडतो. तसेच जनतेमध्ये गुन्हेगारी भीती निर्माण करणे आणि विविध राजकीय व सामाजिक गटांमध्ये वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न या वक्तव्याद्वारे करण्यात आल्याचा आरोप आहे. संघ आणि भाजपच्या विचारसरणीला विषारी संबोधून त्यांच्या उच्चाटनाची भाषा वापरणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्यास प्रवृत्त करणारे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.(Mallikarjun Kharge)
 
हे विधान हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये सांप्रदायिक दरी वाढवण्याचा प्रयत्न असल्याचेही तक्रारीत म्हटले असून, यामुळे आसाममधील सार्वजनिक शांतता व सामाजिक सौहार्द धोक्यात येऊ शकते आणि निवडणूक वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. वेळेत कारवाई न झाल्यास अशा विधानांमुळे सांप्रदायिक तणाव वाढण्याची शक्यता असल्याचीही चेतावणी देण्यात आली आहे.(Mallikarjun Kharge)
 
संघाने स्पष्ट केले की, लोकशाही संवाद संविधानिक व कायदेशीर मर्यादांमध्ये राहूनच व्हायला हवा आणि निवडणूक राजकारणात समाजातील सलोखा व सार्वजनिक शांततेला बाधा आणणारी भाषा टाळली पाहिजे.(Mallikarjun Kharge)
  

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक