मुंबई : (US Iran Ceasefire) अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या ४० दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. यानंतर भारताने बुधवारी या युद्धविरामाचे स्वागत केले असून या तात्पुरत्या युद्धविरामामुळे पश्चिम आशियामध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.US Iran Ceasefire)
भारत सरकारने यावेळी संघर्षाचे मानवतावादी आणि आर्थिक परिणाम देखील अधोरेखित केले आहेत. या संघर्षामुळे लोकांना प्रचंड हाल सोसावे लागल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार साखळीमध्ये अडथळा आल्याचेही भारत सरकारने यावेळी नमूद केले आहे. राजनैतिक मार्गांनी काढलेला शांततापूर्ण तोडगा हाच एकमेव व्यवहार्य मार्ग असल्याच्या आपल्या दीर्घकालीन भूमिकेचाही भारत सरकारने यावेळी पुनरुच्चार केला.US Iran Ceasefire)
निवेदनात नेमकं काय म्हटलं?
"आम्ही युद्धविरामाचे स्वागत करतो आणि आशा व्यक्त करतो की यामुळे पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांततेकडे घेऊन जाईल. आम्ही यापूर्वीही सातत्याने तणाव कमी करणे, चर्चा आणि डिप्लोमसी हे सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी आवश्यक असल्याचे समर्थन करत आलो आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे."
"या संघर्षामुळे लोकांचे आधीच प्रचंड हाल झाले आहेत. तसेच यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापर साखळी विस्कळीत झाली आहे. आम्हाला होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून कुठल्याही अडथळ्याशिवाय नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि जागतिक व्यापाराचा प्रवाह सुरू राहणे अपेक्षित आहे."
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, गेल्या काही आठवड्यांमध्ये या मार्गात अडथळे आल्याने जगभरातील ऊर्जा बजारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.US Iran Ceasefire)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\