मुंबई : (US-Iran Ceasefire) शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या अलीकडील घडामोडींना लक्षात घेऊन भारतातील परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पश्चिम आशियातील सद्यस्थिती पाहता, भारतीयांना तातडीने इराण सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सूचवलेल्या मार्गांचा अवलंब करणे आणि दूतावासाशी सातत्याने संपर्कात राहणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(US-Iran Ceasefire)
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या सूचनेनुसार, भारतीयांनी तातडीने दूतावासाशी संपर्क साधावा, सुचवलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करावा आणि शक्य तितक्या लवकर इराणमधून बाहेर पडावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. ही सूचना सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली असून, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत अधिक सतर्क राहण्यावर भर देण्यात आला आहे.(US-Iran Ceasefire)
भारतीय नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे आवश्यक असल्यास जलद आणि समन्वित निर्गमनाची प्रक्रिया सुकर होईल, असे मंत्रालयाने सांगितले आहे. यापूर्वी, ७ एप्रिल रोजी भारतीय दूतावासाने मार्गदर्शन जारी करत, कोणताही प्रवासाचा निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचा सल्ला दिला होता.(US-Iran Ceasefire)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\