मुंबई : (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) मणिनगर येथे अहमदाबाद–वडोदरा रेल्वे मार्गावर सुमारे 1360 मेट्रिक टन वजनाच्या अत्यंत जड प्रीकास्ट-प्रेस्ट्रेस्ड गर्डरचे यशस्वीपणे लॉन्चिंग करण्यात आले आहे.
हा प्रीकास्ट काँक्रीट गर्डर ३४ मीटर लांबीची असून तिचा क्रॉस-सेक्शन ५.५ मीटर x ४.५ मीटर आहे. मणिनगर रेल्वे स्थानकाजवळ अशा एकूण पाच बीम बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व गर्डर साइटवरच प्रीकास्ट पद्धतीने तयार करून उभारले जात आहेत.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
संपूर्ण लॉन्चिंग प्रक्रिया कठोर सुरक्षा मानकांचे पालन करत केवळ ३.५ तासांत पूर्ण करण्यात आली. हे काम भारतीय रेल्वेसोबत समन्वय साधून पूर्ण ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दरम्यान पार पडले. यापूर्वी या कामासाठी सुमारे ६ महिन्यांच्या कॉशन ऑर्डरची आणि जवळपास ९ तासांच्या ब्लॉकची आवश्यकता भासणार होती. मात्र, सूक्ष्म नियोजन आणि कार्यक्षम अंमलबजावणीमुळे हा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आणि अहमदाबाद- वडोदरा विभागातील दोन्ही लाईन्सवर हे काम फक्त ३.५ तासांत पूर्ण करण्यात यश आले.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
हे ऑपरेशन अनेक अभियांत्रिकी आव्हानांचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. सुमारे १३६० मेट्रिक टन वजनाचे अल्ट्रा-हेवी लिफ्ट हाताळणे हे भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांवरील सर्वात मोठ्या लिफ्ट्सपैकी एक मानले जाते. मर्यादित कार्यक्षेत्र, ओव्हरहेड उपकरणे आणि अनेक सक्रिय रेल्वे लाईन्स यांमुळे या कामाची गुंतागुंत अधिक वाढली होती. अशा परिस्थितीत हे गर्डर सुमारे 15 मीटर उंचीवर अचूक स्थापनेसाठी उच्च दर्जाची अचूकता आवश्यक होती.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.