Mumbai Drain Cleaning Drive : मुंबईतील नालेसफाई आणि गाळ उपसा कामांना वेग!

३१ मेपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

    08-Apr-2026
Total Views |
Mumbai Drain Cleaning Drive
 
मुंबई : (Mumbai Drain Cleaning Drive) आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नालेसफाई आणि गाळ उपसा कामांना वेग देण्याचे आदेश देत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ३१ मे २०२६ पर्यंत ही कामे कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन गाळ काढण्यावर प्राधान्याने भर देण्यास त्यांनी सांगितले. शहरातील मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मॅनहोल आणि ढाप्यांची सद्यस्थिती तपासून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले. ज्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत, त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्यासही त्यांनी सांगितले.(Mumbai Drain Cleaning Drive)
 
मिठी नदी आणि नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी
 
आयुक्त अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी आणि दादर-धारावी परिसरातील नालेसफाई व गाळ उपसा कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये जेतवन उद्यानाजवळील मिठी नदी, नेहरू विज्ञान केंद्र नाला (वरळी) आणि दादर-धारावी नाल्याचा समावेश होता.(Mumbai Drain Cleaning Drive)
 
नेहरू विज्ञान केंद्र नाल्यातील कामांचा आढावा घेताना, पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करून गाळ आणि कचरा तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.(Mumbai Drain Cleaning Drive)
 
मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या गाळ उपसा कामांचा आढावा घेताना आयुक्तांनी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले. कामांची गती वाढवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.(Mumbai Drain Cleaning Drive)
 
सखल भागांवर विशेष लक्ष
 
वरळी नाका आणि संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन मेट्रो व रस्ते विभागाच्या समन्वयाने जलवाहिन्यांच्या जोडण्या सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. दादर-धारावी नाल्यात नागरिकांकडून फेकल्या जाणाऱ्या तरंगत्या कचऱ्यामुळे नालेसफाईत अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा स्वच्छता करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच, नाल्यांच्या काठावरील काही ठिकाणी भिंती खचल्याने धोका निर्माण होत असल्याने तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.(Mumbai Drain Cleaning Drive)
 
एआय तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शकता!
 
नालेसफाई आणि गाळ उपसा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) आधारित प्रणालीचा वापर करण्यात येत असून, या प्रणालीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले.(Mumbai Drain Cleaning Drive)
 
विभागवार समन्वय ठेवण्यावर भर!
 
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई, गाळ उपसा, मॅनहोल तपासणी आणि विभागांमधील समन्वय यावर महापालिका प्रशासनाने भर दिला असून, यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Mumbai Drain Cleaning Drive)