मुंबई : (Chief Minister Fellowship Program) राज्यातील विकास प्रक्रिया, शासनाचे यंत्रणेतील कामकाज आणि त्यातील प्रक्रियेचा तरुणांना अनुभव घेता यावा यासाठी मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रम (Chief Minister Fellowship Program) राबवण्यात येत असून याद्वारे तरूणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळते.(Chief Minister Fellowship Program)
राज्यात सन २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रम राबवण्यात आला. त्यानंतर आता २०२६-२७ मध्येही हा फेलोशीप कार्यक्रम राबवण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बुधवारी, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Chief Minister Fellowship Program)
अर्जदार भारताचा नागरिक असावा. कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि त्यात किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक असेल. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशीप, अप्रेंटीसशीप किंवा आर्टीकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. मराठी भाषा लिहिता, वाचता येणे आवश्यक तर, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक. संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान असणे गरजेचे आहे.(Chief Minister Fellowship Program)
शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांचा दर्जा
अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस अर्जदाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावे. या कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या एक तृतीयांश असेल. या फेलोंचा दर्जा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल. या फेलोशिपचा कालवधी १२ महिन्यांचा असेल.(Chief Minister Fellowship Program)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....