पालिकेत अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांशी साटेलोटे? ,प्रकल्प-टेंडर प्रक्रियेवर भाजपाचा आरोप

    08-Apr-2026
Total Views |
बृहन्मुंबई महानगरपालिका,अमित साटम, कंत्राटदार, भाजप Brihanmumbai Municipal Corporation,Amit Satam, Contractor, BJP
 
मुंबई :(Brihanmumbai Municipal Corporation) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील संगनमतामुळे प्रकल्पांची आखणी व टेंडर प्रक्रिया स्वतःच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, संबंधित सिंडीकेट मोडीत काढण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
 
भाजप आमदार अमित साटम यांनी पालिका (Brihanmumbai Municipal Corporation)आयुक्तांना पत्र लिहून या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. पत्रात त्यांनी टेंडर प्रक्रियेतील तर्कसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक विसंगती निदर्शनास आणल्या आहेत.(Brihanmumbai Municipal Corporation)
 
साटम यांनी नमूद केले आहे की, शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांच्या लांबीमध्ये मोठा फरक असतानाही प्रत्येकी ५० कोटी रुपयांचे समान वाटप करण्यात आले. प्रत्यक्षात पश्चिम उपनगरांमध्ये इतर भागांच्या तुलनेत जवळपास तीनपट रस्ते आहेत. त्यामुळे असे वाटप मनमानी असून त्यामागे सखोल अभ्यासाचा अभाव दिसून येतो, असे त्यांनी म्हटले आहे.(Brihanmumbai Municipal Corporation)
 
याशिवाय काही कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रकल्पांची संकल्पना तयार करून टेंडर आपल्या फायद्यासाठी तयार करतात, असा आरोपही त्यांनी केला. ही पद्धत तात्काळ थांबवून पालिकेची कामकाज पद्धती पारदर्शक करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Brihanmumbai Municipal Corporation)
 
कामांची संकल्पना ही कंत्राटदारांनी नव्हे, तर निवडून आलेले लोकप्रतिनिधी, प्रशासन किंवा दोघांच्या समन्वयातून ठरवली जावी, असेही साटम यांनी सुचवले. पालिकेची यंत्रणा कंत्राटदार-केंद्रित न राहता नागरिक-केंद्रित होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन या आरोपांची चौकशी करून कोणती कारवाई करते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.(Brihanmumbai Municipal Corporation)