Chanakya Mandal Parivar : चाणक्य मंडल परिवारच्या UPSC 2025 व MPSC 2024 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा

    08-Apr-2026   
Total Views |

Avinash Dharmadhikari

मुंबई : (Avinash Dharmadhikari) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'चाणक्य मंडल परिवार'तर्फे एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 2025 तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 2024 परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य अभिनंदन सोहळा गुरुवार, दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता दादर (शिवाजी पार्क) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे.(Avinash Dharmadhikari)

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी भूषवणार आहेत. या सोहळ्यात UPSC मध्ये यश मिळवलेल्या किरण कामटे (AIR ५३), रजत वाळके (AIR ५१४), प्रांजली मेश्राम (AIR ७६७), मनीष झेंडे (AIR ७८८) यांसह MPSC मधील निलेश तांबे (सहाय्यक राज्यकर आयुक्त तसेच गट ब परीक्षेत राज्यात पहिला) आणि साक्षी चाकूरकर (गट विकास अधिकारी) यांचा विशेष अभिनंदन करण्यात येणार आहे.(Avinash Dharmadhikari)

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ यशस्वी अधिकाऱ्यांचा प्रवास व अभ्यासाचे नियोजनच नव्हे, तर स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी कसे बनावे याविषयीही थेट मार्गदर्शन मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. मात्र, नाव नोंदणी अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ०८०-६९०१५४१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.(Avinash Dharmadhikari)

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.