मुंबई :(Agricultural Damage) राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर शेतीचे क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.(Agricultural Damage)
५ जणांचा मृत्यू, ९ लोक जखमी
जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे(Agricultural Damage) केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले. यात लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे ५ लोकांचा मृत्यु आणि ९ लोक जखमी झाले असून ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.(Agricultural Damage)
पंचनाम्याची कार्यवाही सुरू
प्राथमिक अंदाजानुसार, एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.(Agricultural Damage)
१०५ टीएमसी पाणीसाठा तयार
दरम्यान, जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पुर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली.(Agricultural Damage)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....