Jammu Kashmir Terror Arrests : १६ वर्षांपासून फरार असलेल्या पाक लष्कर कमांडरसह ५ दहशतवाद्यांना अटक!

जम्मू आणि काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई

    08-Apr-2026   
Total Views |
Jammu Kashmir Terror Arrests
 
मुंबई : (Jammu Kashmir Terror Arrests) जम्मू आणि काश्मीर पोलिसांना नियोजित कारवाई करत एका दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून यामध्ये भारतात दीर्घकाळ सक्रिय असलेले २ पाकिस्तानी दहशतवादीही समाविष्ट आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरा, जो सुमारे १६ वर्षांपासून फरार आणि वाँटेड पाकिस्तानी कमांडर होता, त्याला अखेर अटक करण्यात आली. याशिवाय, उस्मान उर्फ खुबैब या दुसऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यालाही श्रीनगर येथून पकडण्यात आले.(Jammu Kashmir Terror Arrests)
 
तपासात असे उघड झाले की, नकीब भट्ट, आदिल राशिद भट्ट आणि गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा हे तीन स्थानिक सहकारी या दहशतवाद्यांना आसरा, अन्न आणि लॉजिस्टिक मदत पुरवत होते. या ऑपरेशनअंतर्गत जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि राजस्थान येथे १९ हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये पोलिसांनी आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दहशतवादी नेटवर्कशी संबंधित महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.(Jammu Kashmir Terror Arrests)
 
सुरक्षा यंत्रणांच्या मते, ही कारवाई लष्कर-ए-तैयबाच्या हायब्रिड मॉड्यूल, बनावट ओळख प्रणाली आणि आंतरराज्यीय सपोर्ट नेटवर्कला मोठा धक्का देणारी ठरली आहे. अलीकडील काळातील दहशतवादविरोधी कारवाईतील ही एक मोठी यशस्वी मोहीम मानली जात आहे. जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण नेटवर्कचा मागोवा घेत आहेत. यामुळे भारतातील इतर लपलेले सहकारी आणि लॉजिस्टिक साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.(Jammu Kashmir Terror Arrests)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक