Dr. Mohanji Bhagwat : समाजाला गोभक्त बनवा, गोहत्या आपोआप थांबेल!

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    07-Apr-2026   
Total Views |
Dr. Mohanji Bhagwat
 
मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) गो-रक्षण आणि जनजागृतीबाबत त्यांनी सांगितले की, केवळ कायदे करून प्रश्न सुटत नाहीत. लाल दिवा तेव्हाच काम करतो, जेव्हा लोक त्याचे पालन करतात. खरी ताकद व्यवस्थेत नसून समाजात आहे, सत्ताधाऱ्यांच्या मनात गो-रक्षणाची भावना असली, तरी कोणतेही धाडसी पाऊल उचलण्याआधी समाजात याबाबत व्यापक विचार निर्माण होणे आवश्यक आहे. समाजाला गोभक्त बनवा, गोहत्या आपोआप थांबेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयेसंवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohanji Bhagwat) यांनी केले.
 
संत श्रीमद्‌जगद्गुरू द्वाराचार्य श्रीमलूकदास जी महाराज यांच्या ४५२व्या जयंतीनिमित्त वृंदावन मथुरा येथे मंगळवारी आयोजित संत संमेलनात ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी धर्म, लोकशाही, गो-रक्षण आणि भारताच्या जागतिक भूमिकेवर त्यांनी सखोल विचार मांडले.(Dr. Mohanji Bhagwat)
 
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, सशक्त आणि आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी समाज चांगला असणे ही प्राथमिक अट आहे. आपली लोकशाही आहे, त्यामुळे त्यात चांगले लोक यायला हवेत. ही प्रतिनिधिक लोकशाही आहे, जिथे आपणच आपले प्रतिनिधी निवडतो. त्यामुळे आपणच वाईट राहिलो, तर आपले प्रतिनिधीही तसेच असतील. आपण जितके चांगले होऊ, तितके चांगले लोक वर पोहोचतील.”(Dr. Mohanji Bhagwat)
 
हेही वाचा : नागपुरच्या दोसर भवन चौक परिसरात सापडली स्फोटकं!,१५ काडतुसे, ५० डेटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळल्याने परिसरात खळबळ
 
धर्ममार्गावर चालण्यासाठी अहंकाराचा त्याग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “धर्माचे चार आधार आहेत; सत्य, करुणा, शुचिता आणि तप. त्यात करुणा सर्वात महत्त्वाची आहे. धर्माचा मूलभूत हेतू सृष्टीचा सातत्यपूर्ण प्रवाह टिकवणे हा आहे. आपण सर्वांनी मिळून राहणे, हेच धर्माचे मूळ स्वरूप आहे."(Dr. Mohanji Bhagwat)
 
भारत राहिला, तरच जग टिकेल
 
भारत हा जगाचा आत्मा आहे. भारत राहिला, तरच जग टिकेल, असे सांगत सरसंघचालकांनी भारताच्या आध्यात्मिक नेतृत्वावर भर दिला. भारताने आपल्या पूर्ण वैभवासह उभे राहून जगाला सुख-शांतीचा मार्ग दाखवावा, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. संघ आणि संत समाज या दोघांचेही कार्य या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(Dr. Mohanji Bhagwat)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक