Navnath Ban : मेट्रो चे वाढते जाळे हा मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस - नवनाथ बन

    07-Apr-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "मेट्रोचे वाढते जाळे हा मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस असून मुंबईकरांसाठी नवीन मोठी आनंदाची बातमी म्हणजे मेट्रो २बी आणि मेट्रो ९ या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाले आहे. चेंबूर ते मंडळा या मार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार असून सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. काँग्रेसच्या काळात एकच मेट्रो होती, तर आज भाजपच्या नेतृत्वाखाली ११ प्रकल्पांवर काम सुरू आहे." असे प्रतिपादन भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी मंगळवार दि.७ रोजी व्यक्त केले.(Navnath Ban)
 
"बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसचा उमेदवार की आघाडीचा उमेदवार यावर स्पष्टता नसून बारामती पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेण्यात उबाठा गट अपयशी ठरल्याचं चित्र आहे. एका बाजूला संजय राऊत काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे वेगळी भूमिका घेत आहेत." असा पलटवार बन (Navnath Ban) यांनी केला.
 
हेही वाचा : Rajabhau Nene Smruti Puraskar : अंजली तागडे, विराग पाचपोर यांना 'राजाभाऊ नेने' पुरस्कार जाहीर!
 
"राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा हा विकासाभिमुख निर्णय असल्याचं सांगण्यात आलं असून रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधल्यानंतर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठा बदल झाला आहे."असे मत बन (Navnath Ban) यांनी राहुरी पोटनिवडणुकीबाबत व्यक्त केले.
 
"संजय राऊत काँग्रेसला सतत सल्ले देत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांना प्रभावित करून काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.तसेच काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांसारख्या नेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे." असे बन (Navnath Ban) म्हणाले.
 
"संयुक्त महाराष्ट्र दालनाच्या दुरवस्थेवरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच प्रश्न उपस्थित होतात. २०१० मध्ये उद्घाटन झालेल्या या दालनाची अवस्था एवढी खराब कशी झाली, याबाबत उत्तर त्यांनी द्यावं. तसेच राऊत यांनी खासदार निधीतून मदत का केली नाही." असेही बन (Navnath Ban) म्हणाले.