Thane Metro Inauguration : ठाणेवासियांचे मेट्रोचे स्वप्न अखेर पूर्ण; दहिसर ते काशिगाव मुंबई मेट्रो ९ चे लोकार्पण

मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांची प्रतीक्षा संपली,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण

Total Views |
 
Thane Metro Inauguration
 
ठाणे : (Thane Metro Inauguration) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्प ९ मधील दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्पातील मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मंगळवार, दि. ૭ एप्रिल रोजी संपन्न झाले. ठाणे जिल्ह्यातील या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या लोकार्पणानंतर त्याची प्रवासी सेवा बुधवार दि. ८ एप्रिलपासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे.(Thane Metro Inauguration)
 
दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथे आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासह मेट्रो प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रोतून प्रवास करत सुविधांचा आढावा घेतला.(Thane Metro Inauguration)
 
मिरा-भाईंदरसाठी गेमचेंजर मेट्रो प्रकल्प
 
सध्या दहिसर ते काशीगाव हा प्रवास रस्त्याने 30 ते 45 मिनिटांचा होत असताना, मेट्रोमुळे तोच प्रवास केवळ 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेची बचत होणार आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्पांपैकी मेट्रो लाइन-९ ही सर्वात महत्त्वाची लाइन असून ती मेट्रो-७ ला जोडली गेलेली असल्याने प्रवाशांना थेट अंधेरीपर्यंत जाता येईल. या मार्गावर गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटं ५० सेकंदांनी गाडी धावणार आहे.(Thane Metro Inauguration)
 
हेही वाचा : Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! रॉकेट हल्ल्यात २ चिमुकल्यांचा मृत्यू; BSF जवानाची पत्नी गंभीर जखमी
 
ठाणे-बोरिवली दुहेरी मार्गिकेच्या बोगदा खोदकामाला सुरुवात
 
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या खोदकामालाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या ११.८४ किमी मार्गात संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणारे हे जुळे बोगदे ९० मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांवर आणतील.या दोन्ही बोगद्यांच्या खोदकामासाठी दोन टनेल बोअरिंग मशीन जमिनीखाली खोदकाम करतील. यापैकी पहिल्या 'टीबीएम'चे नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील एका फुलपाखराच्या नावावरून नायक असे ठेवण्यात आले आहे. या मशीनद्वारे हे खोदकाम आज सुरू झाले आहे. तर दुसऱ्या दुसऱ्या टीबीएमचे नाव अर्जुना असून राष्ट्रीय उद्यानातील एका जुन्या वृक्षाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही बोगदे जमिनीखालून जात असल्यामुळे कोणतीही वृक्षतोड होणार नाही. पण तरीही 11,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.(Thane Metro Inauguration)
 
पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-७ शी जोडली गेल्याने प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उद्घाटन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. सध्या एक ते दोन तास लागणारा प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही मेट्रो लाईन-३ शी जोडली जाणार असून, मीरा भाईंदर ते कुलाबा दरम्यान सीमलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.(Thane Metro Inauguration) 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
राज्यातील मेट्रो नेटवर्क सध्या 101 किलोमीटरपर्यंत पोहोचले असून भविष्यात ते 337 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहतूक 20 ते 30 टक्क्यांनी कमी होईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन व पुनर्वसनासारखी आव्हाने पार करत शासनाने गतीने काम केल्याचे सांगून त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले. हा लोकहिताचा प्रकल्प असून नागरिकांनीही सहकार्य करावे.(Thane Metro Inauguration)
-एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.