Ram Mandir in Shimla : शिमल्यातल्या राम मंदिरात होणाऱ्या निकाहावरून तणाव

मंदिराच्या हॉलच्या वापरावर हिंदू संघटनांचा आक्षेप; बुकिंग रद्द करण्याची मागणी

    07-Apr-2026   
Total Views |
Ram Mandir in Shimla
 
मुंबई : (Ram Mandir in Shimla) हिमाचल प्रदेशातल्या शिमला येथे राम बाजार परिसरातील अत्यंत प्राचीन असे एक राम मंदिर आहे. (Ram Mandir in Shimla) याच मंदिरात इस्लामिक निकाह होणार असल्याच्या बातमीमुळे वाद निर्माण झाला असून हिंदू संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. अलीकडेच एका मुस्लिम कुटुंबाने ११ एप्रिल रोजी या हॉलमध्ये आपल्या मुलीचा निकाह करण्यासाठी नोंदणी केली होती. संबंधित कुटुंब ईदगाह कॉलनीतील रहिवासी आहे. ही माहिती समोर येताच हिंदू संघटनांमध्ये नाराजी पसरली.(Ram Mandir in Shimla)
 
अशी माहिती आहे की, हे मंदिर बहुमजली असून वरच्या मजल्यावर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत, तर खालच्या मजल्यांमध्ये हॉल असून ते लग्नसमारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरले जातात. या मंदिराचे व्यवस्थापन सूद सभा करते. हिंदू संघर्ष समितीने मंदिरामध्ये होणाऱ्या निकाहबाबत आक्षेप घेत मंदिराच्या मालमत्तेचा वापर धार्मिक परंपरांच्या विरोधात करू नये, अशी मागणी केली आहे. समितीने सूद सभेला निवेदन देत निकाहाची बुकिंग रद्द करण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. प्रतीकात्मक आंदोलन करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सूद सभेने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.(Ram Mandir in Shimla)
 
सभेचे अध्यक्ष राजीव सूद यांनी सांगितले की, सर्व समुदायांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि घटनात्मक चौकटीत राहूनच घेतला जाईल. गेल्या पाच वर्षांत या हॉलमध्ये १५ पेक्षा अधिक मुस्लिम कुटुंबांनी निकाह केल्याची माहिती त्यांनी दिली. हॉलमध्ये मांस, मासे आणि मद्य यांना बंदी असल्याने धार्मिक वातावरण कायम ठेवले जाते.(Ram Mandir in Shimla)
 
शिमलामध्ये अलीकडेच संजौली मशिदीच्या वादानंतर ही घटना समोर आली आहे, ज्यामुळे शहरात आधीच चर्चेचे वातावरण आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्येही राम मंदिरात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या भेटीदरम्यान साईबाबांच्या मूर्तीवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. सध्या या प्रकरणावरून रस्त्यावर आंदोलन झालेले नसले तरी स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू आहे. हिंदू संघटना मंदिराची परंपरा जपण्यावर ठाम असून, सूद सभा दोन्ही बाजूंच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगत आहे.(Ram Mandir in Shimla)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक