Pakistan Smart Lockdown: पाकिस्तानची दुर्दशा! आज रात्रीपासून ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू; हतबल सरकारची घोषणा

    07-Apr-2026   
Total Views |

Pakistan Smart Lockdown


मुंबई : (Pakistan Smart Lockdown)
मध्यपूर्वेतील युद्धाची झळ जगभरातील सर्वच देशांना बसली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक रोखल्यानंतर दक्षिण आशिया आणि युरोपातील राष्ट्रांना इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. इंधन टंचाईच्या संकटामुळे पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. इंधनपुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याने पाकिस्तानला ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू करण्याची वेळ आली आहे. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.(Pakistan Smart Lockdown)


निवेदनात काय म्हटलंय? (Pakistan Smart Lockdown)


- खैबर पख्तुनख्वा, पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि जम्मू आणि काश्मीर (PoJK) येथील बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजता बंद करावे लागतील.


- खैबर पख्तुनख्वाच्या विभागीय मुख्यालयांमधील बाजारपेठा रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.
 
- बेकरी, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील.


- विवाह सोहळ्यांसाठी वापरण्यात येणारे हॉल, तंबू आणि इतर ठिकाणे देखील रात्री १० वाजेपर्यंत बंद करणे बंधनकारक असेल. रात्री १० वाजल्यानंतर घरांमध्ये किंवा खाजगी मालमत्तांमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर बंदी असेल.
 
याव्यतिरिक्त, औषधांची दुकाने आणि फार्मसींना या वेळेच्या मर्यादेतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा नवीन नियम मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून लागू होणार आहे.(Pakistan Smart Lockdown)





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\