Chipi-Mumbai Air Service : चिपी-मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा; सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

दोनवेळा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या सूचना

Total Views |
Chipi-Mumbai Air Service
 
मुंबई : (Chipi-Mumbai Air Service) सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा (Chipi-Mumbai Air Service) जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.(Chipi-Mumbai Air Service)
 
पालकमंत्री राणे यांनी मंत्रालयात मंगळवार, दि.७ एप्रिल रोजी चिपी विमानतळावरून मुंबईसाठी सेवा सुरू करण्याबाबत बैठक घेतली. या बैठकीस विमानचालनचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) चिपी विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह, महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या व्यवस्थापक प्रांजली खवळे, कार्यकारी अभियंता मिस्बाह अन्वार आदी उपस्थित होते.(Chipi-Mumbai Air Service)
 
मंत्री राणे म्हणाले, चिपी मुंबई हवाई वाहतूक करिता शासनाकडून व्हीजीएफ मंजूर आहे. मात्र विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. यासाठी संबंधित कंपनीने विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. मुंबईसाठी सकाळी व सायंकाळी अशी दिवसातून दोन वेळा विमान सेवा सुरू करण्याबाबतही कंपनीने विचार करावा असेही ते म्हणाले. चिपी मुंबई विमान सेवा सूरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा परवानग्यासह अन्य परवाने घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.(Chipi-Mumbai Air Service)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.