Manbadha Book Release : 'मनबाधा' म्हणजे साधकाचा आध्यात्मिक प्रवास

मंत्री अॅड. आशिष शेलार; प्रशांत डिंगणकर लिखित "मनबाधा" या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

    07-Apr-2026   
Total Views |
(Manbadha Book Release)
 
मुंबई : (Manbadha Book Release) 'मनबाधा' हे पुस्तक (Manbadha Book Release) एका साधना करणाऱ्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे. आध्यात्मिक शक्तीची राधा शोधताना, त्या आध्यात्मिक प्रवासातल्या टप्प्यांचे प्रवास वर्णन आहे. ती एक शक्ती असल्यामुळे, तिच्या शोधात तो निघाला आहे. हा, निर्गुण, निराकार, ते सगुण, साकार शक्तीचा, त्या शक्ती रूपी राधेचा शोधण्याचा प्रवास असल्याचे गौरवोद्गगार सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले.(Manbadha Book Release)
 
पु. ल. अकादमीच्या लघु नाट्यगृहात स्वामीराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या प्रशांत डिंगणकर लिखित 'मनबाधा' या पुस्तकाच्या (Manbadha Book Release) प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी तथा लेखक प्रवीण दवणे, कवी डॉ. महेश केळुस्कर, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, प्रकाशक रजनिश राणे यांच्यासह गझलनवाझ भिमराव पांचाळे, कवी अशोक नायगावर, प्रा नरेंद्र पाठक, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारफकवार, लेखक संजय कृष्णाजी पाटील, डॉ. विणा सानेकर यांच्यासह अनेक मान्यवर कवी, लेखक उपस्थित होते.(Manbadha Book Release)
 
हेही वाचा : Congress vs Parth Pawar: 'कृतघ्न मुलगा, महाशक्तीसमोर...!' काँग्रेसचा पार्थ पवारांवर जहरी पलटवार, बारामतीत राजकारण तापलं?
 
मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, 'मनबाधा' हे पुस्तक (Manbadha Book Release) वाचताना लेखक काहीतरी शोधतोय आणि ती राधा आहे. हे पुस्तक केवळ ललितबंधाचे आहे, असे मला वाटत नाही. याची व्याप्ती मोठी झालेली दिसते. या पुस्तकात अद्भुत वाङ्मयीन तथा अध्यात्मिक प्रवाससुद्धा आपल्याला दिसतो. हे पुस्तक राधा शोधतानाच्या टप्प्याचे प्रवासवर्णन आहे. निर्गुण निराकार ते सगुण साकार शक्तीचा हा प्रवास आहे. हा ललित ग्रंथ असला तरी यात तात्विक विधाने करत आहे."(Manbadha Book Release)
 
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत व्हावे - डॉ. महेश केळुस्कर
 
दरम्यान, 'मनबाधा' या पुस्तक प्रकाशनाच्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुस्कर यांनी १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत व्हावे, अशी मागणी केली. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. मुंबईत खूप वर्षे हे संमलेन झालेले नाही. इथे सगळ्या सोयी असल्याने ते इथे घ्यावे, असे ते म्हणाले. उपस्थितांनी या मागणीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.(Manbadha Book Release)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....