नवी दिल्ली : ( Narendra Modi ) भारताने आपल्या नागरी अणुऊर्जा प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा गाठत तीन-टप्प्यातील अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. तमिळनाडूतील कल्पक्कम येथे उभारण्यात आलेल्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टरने यशस्वीरित्या ‘क्रिटिकलिटी’ प्राप्त केली आहे.( Narendra Modi )
या अभूतपूर्व यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आज भारत आपल्या नागरी अणुऊर्जा प्रवासात एक निर्णायक पाऊल टाकत आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा प्रगत रिअॅक्टर आपल्या वैज्ञानिक क्षमतेची आणि अभियांत्रिकी कौशल्याची ताकद दर्शवतो.”( Narendra Modi )
पंतप्रधानांनी पुढे नमूद केले की, हा फास्ट ब्रीडर रिअॅक्टर जितके इंधन वापरतो त्यापेक्षा अधिक इंधन निर्माण करण्यास सक्षम आहे, जे भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. “अणुऊर्जा कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील विपुल थोरियम साठ्यांचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने हे एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे फास्ट ब्रीडर रिअॅक्टर?
फास्ट ब्रीडर रिअॅक्टर ही अत्याधुनिक अणुऊर्जा तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली असून, ती वापरलेल्या इंधनापेक्षा अधिक अणुइंधन निर्माण करते. त्यामुळे ऊर्जा उत्पादन अधिक कार्यक्षम आणि दीर्घकालीन होते. भारताच्या तीन-टप्प्यातील अणुऊर्जा धोरणात याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.(Narendra Modi)
या यशामुळे भारताने अणुऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे आणखी एक मोठी झेप घेतली आहे. हे यश देशातील वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधकांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे सांगत पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन केले.( Narendra Modi )
तीन-टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम नेमका काय ?
या कार्यक्रमात ;
• पहिल्या टप्प्यात स्वदेशी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर्स (PHWR) द्वारे नैसर्गिक युरेनियमचा वापर
• दुसऱ्या टप्प्यात वापरलेल्या इंधनातून मिळणाऱ्या प्लुटोनियमचा फास्ट ब्रीडर रिऍक्टर्समध्ये उपयोग
• तिसऱ्या टप्प्यात थोरियमचा मोठ्या प्रमाणावर वापर करून युरेनियम-233 निर्मिती
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.