मुंबई : (TRP of TV News Channels) पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही वाहिन्यांकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव वृत्तांकनामुळे सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. प्रसारण श्रोता संशोधन परिषदेला (BARC) पुढील चार आठवडे मानांकन आकडेवारी जारी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वसामान्यांमधील भीती आणि संभ्रम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.(TRP of TV News Channels)
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, काही वृत्तवाहिन्या युद्धाच्या परिस्थितीचे अनावश्यकपणे खळबळजनक/सनसनाटी वृत्तांकन करत आहेत. अशा प्रकारच्या मजकुरामुळे सामान्य जनतेमध्ये, विशेषतः बाधित भागातील कुटुंबांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ शकते.(TRP of TV News Channels)
हे लक्षात घेऊन, सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी अहवालावर चार आठवड्यांसाठी बंदी घातली आहे. या कालावधीत, वाहिन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन सामान्य प्रक्रियेनुसार केले जाणार नाही. हे उल्लेखनीय आहे की, ६ मार्च रोजी पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वृत्तवाहिन्यांचे टीआरपी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले होते.(TRP of TV News Channels)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\