मुंबई : (Gautam Birhade) मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालक (प्रकल्प)पदी गौतम बिर्हाडे (Gautam Birhade) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवार, दि.७ एप्रिल रोजी रीतसर पदभार स्वीकारला. याप्रसंगी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.(Gautam Birhade)
गौतम बिर्हाडे (Gautam Birhade) हे भारतीय रेल्वे सेवा अभियंता कॅडरमधील वरिष्ठ अधिकारी असून त्यांना भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल प्रकल्पांमध्ये ३३ वर्षांहून अधिक अनुभव आहे. बिऱ्हाडे यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू येथून अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. बहुविध पायाभूत प्रकल्पांचे नियोजन, रचना, अंमलबजावणी आणि कार्यान्वयन यामध्ये त्यांना व्यापक अनुभव आहे. विशेषतः भूमिगत व उन्नत मेट्रो मार्गिका, पूल आणि रेल्वे प्रणाली या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.(Gautam Birhade)
या नियुक्तीपूर्वी ते पुणे येथील महा-मेट्रोमध्ये कार्यकारी संचालक (भूमिगत) म्हणून कार्यरत होते. त्या पदावर त्यांनी महत्त्वाच्या भूमिगत मेट्रो विभागांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळली. तसेच, त्यांनी मध्य रेल्वेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत अनेक पायाभूत प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून सुरक्षा व गुणवत्ता मानकांचे पालन करून वेळेत प्रकल्प पूर्ण करणे ही त्यांची वैशिष्ट्य आहे.(Gautam Birhade)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.