मुंबई : (Driverless Pod Taxi) "आमचे सरकार मुंबईमध्ये सुगमता आणू इच्छित आहे. सुगमता म्हणजे ५९ मिनिटांमध्ये मुंबई महानगराच्या कोणत्याही भागातून कोणत्याही भागात जाता आले पाहिजे. या इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेतील एक एक टप्पा आता आपण पूर्ण करतो आहे," अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.(Driverless Pod Taxi)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार, दि.७ एप्रिल रोजी देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा १)चे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन करण्यात आले. चेंबूर येथील देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन मेट्रो स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार सना मलिक, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई मेट्रो लाईन 2 ब (डी.एन. नगर ते मंडाले) च्या कोनशिलेचे अनावरण तसेच पॉड टॅक्सीसंदर्भातील (Driverless Pod Taxi) बीकेसी कनेक्ट कंपनीने तयार केलेल्या कॉफीटेबल बुकचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.(Driverless Pod Taxi)
मेट्रो 2 ब डी.एन. नगर ते मंडाले हा एकूण २३.४५६ किमीचा प्रकल्प असून यात एकूण १९ स्थानके आहेत. यापैकी ५ .६ किमीचा पहिला टप्पा आणि पाच स्थानके सुरु करण्यात येत आहेत. यात देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर, देवनार, मानखुर्द, महाराष्ट्रनगर - मंडाळे या स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात या मेट्रोमुळे बीकेसी, अंधेरी, वांद्रे आणि चेंबूरपर्यंत अखंड प्रवास सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो हार्बर लाईनला जोडणारी पहिली मेट्रो असल्याने वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू होत आहे.(Driverless Pod Taxi)
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजचा हा सोहळा केवळ मेट्रो उद्घाटनाचा नाहीतर मुंबईच्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला नवा वेग देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागांमध्ये अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. विशेष म्हणजे ही मेट्रो हार्बर लाईनशी जोडली जाणारी पहिली सेवा ठरणार आहे. म्हणजेच रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतूक यांचा खरा इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टम येथे साकारत आहे. याचबरोबर, वांद्रे-कुर्ला परिसरात टनेल, कोस्टल रोड, मेट्रो आणि भविष्यातील इतर प्रकल्प यांचे जाळे तयार होत असून, सीमलेस मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी हा आपला मुख्य उद्देश आहे. रेल्वे, मेट्रो, बस आणि पाण्यावरील वाहतूक या सर्वांना जोडणारी एकसंध व्यवस्था उभी राहत आहे. आपण २०१६-१७ मध्ये ज्या '५९ मिनिटांत एमएमआरमधील कुठल्याही भागात पोहोच” या संकल्पनेची घोषणा केली होती, त्याच्या दिशेने आपण सातत्याने पुढे जात आहोत. मुंबईला अधिक सुगम, वेगवान आणि अखंड जोडलेले शहर बनवण्याच्या या प्रवासात आपण सर्व मिळून एक मोठा बदल घडवत आहोत.(Driverless Pod Taxi)
मुंबईत धावणार 'ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. शहरातील कुर्ला आणि वांद्रे पूर्वदरम्यान पहिल्या टप्प्यात पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे. या भागात 3.36 किमी मार्गावर ही टॅक्सी धावेल. या मार्गावर एकूण ८ स्थानके असतील. वांद्रे पूर्व, कलानगर,एमएमआरडीए जुनी इमारत, एक्साईज डिपार्टमेंट, भारत डायमंड बोर्स गेट ११ , एमएमआरडीए पे अँड पार्क, एलबीएस मार्ग आणि कुर्ला या स्थानकांवर थांबे असतील. वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या टॅक्सीचा मोठा फायदा होणार आहे. २०३१ पर्यंत पॉड टॅक्सीच्या मार्गाचा ८.८५ किमीपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. या मार्गावर २२ स्थानके असतील. याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पुढील २० महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्परतेने सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.(Driverless Pod Taxi)
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मेट्रो २बी ही पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणारी महत्त्वाची लाईन असून, हार्बर लाईनवरून प्रथमच मेट्रोला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.या प्रकल्पामुळे मेट्रो १, मेट्रो ३, मेट्रो ४, पश्चिम रेल्वे, मोनोरेल आणि हार्बर लाईन यांच्यात सुसूत्र जोडणी होणार आहे. देशातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पालाची आज मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून, ही सेवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणार आहे. हा प्रकल्प दुबई आणि लंडनमधील सुविधांच्या धर्तीवर उभारला जाईल. (Driverless Pod Taxi)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.