मुंबई : (Dr. Vishal Kadne) मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे डॉ. विशाल कडणे (Dr. Vishal Kadne) यांनी कांजूरमार्ग येथील डॉ. दत्ता सामंत माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.(Dr. Vishal Kadne)
सोमवार, ६ एप्रिल रोजी त्यांच्या पुढाकारातून डॉ. दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय, कांजूरमार्ग येथे शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ संस्थेचे पदाधिकारी, भांडुप शाखेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.(Dr. Vishal Kadne)
डॉ. विशाल कडणे (Dr. Vishal Kadne) म्हणाले की, "मराठी शाळांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षक संघटनेने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. भविष्यात मराठी शाळा बंद होऊ नयेत, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे."(Dr. Vishal Kadne)
राजेश्री शिरवडकर म्हणाल्या की, "शाळांमध्ये पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधनांची उपलब्धता, शिक्षकांची कमतरता व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गरजा या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल," असे आश्वासन त्यांनी (Dr. Vishal Kadne) दिले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....