नवी मुंबई : (CIDCO) नवी मुंबई व परिसरातील नियोजित शहरी विकासाला वेग देण्यासाठी सिडको महामंडळाने (CIDCO) सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी १६२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. पायाभूत सुविधा विस्तार, प्रादेशिक दळणवळण सुदृढीकरण आणि परवडणाऱ्या गृहनिर्माणावर यामध्ये विशेष भर देण्यात आला आहे.(CIDCO)
मागील 2025-26 आर्थिक वर्षात सिडकोने ₹9,774.23 कोटींचे उत्पन्न व ₹9,770.26 कोटींचा खर्च नोंदवत ₹3.97 कोटींचा अधिशेष साध्य केला. मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करतानाही आर्थिक शिस्त राखण्यात यश आल्याचे यावरून स्पष्ट होते. तर 2026-27 साठी ₹16,250 कोटी उत्पन्न, ₹16,150 कोटी खर्च आणि ₹100 कोटी अधिशेषाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(CIDCO)
गृहनिर्माणाला चालना
2025-26 मध्ये 16,876 घरांची योजना राबविल्यानंतर आता 2026-27 मध्ये सुमारे 19,300 परवडणाऱ्या घरांची योजना जाहीर करण्याचा मानस आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र अंतर्गत २२५ चौ.किमी परिसरात नियोजित शहरी विस्तारावर भर देत सिडकोकडून एकात्मिक, शाश्वत आणि नागरिक-केंद्रित विकास मॉडेल राबविण्यात येणार आहे.(CIDCO)
कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना प्राधान्य
मेट्रो लाईन 8 (CSMIA–NMIA) : 34.89 किमी लांबीचा मार्ग, 20 स्थानके; 2031 पर्यंत दररोज 9.8 लाख प्रवासी अपेक्षित
मेट्रो विस्तार : बेलापूर–एनएमआयए (3.2 किमी) व पेंढार–एनएमआयए (15 किमी) जोडणी
ठाणे–एनएमआयए एलिव्हेटेड कॉरिडॉर : 25.3 किमी, ₹6,521 कोटी खर्च; प्रवास वेळ 90 मिनिटांवरून 30 मिनिटे
एरोसिटी: 270 हेक्टरमध्ये व्यावसायिक व आतिथ्य विकास
एड्युसिटी: आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे केंद्र
मेडिसिटी: अत्याधुनिक आरोग्य व संशोधन सुविधा
कॉर्पोरेट पार्क (खारघर) : 155 हेक्टरमध्ये आयटी व व्यावसायिक केंद्र
लॉजिस्टिक्स पार्क: जेएनपीए–एनएमआयए दरम्यान 560 हेक्टर
“हा अर्थसंकल्प नवी मुंबईला आर्थिक व गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. विमानतळ, मेट्रो, एरोसिटी, एज्यु सिटी व मेडिसिटीसारख्या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला नवे आयाम मिळतील.”(CIDCO)
- विजय सिंघल, सिडको उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.