ब्रिटिश शिक्षणाला इस्लामी वळण?'द टेलिग्राफ'च्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड

    07-Apr-2026   
Total Views |
britain school syllabus for muslim students
(Image Credit: The Telegraph - पत्नीला कसे मारावे याबद्दल पुस्तकातील परिच्छेद) 
 
मुंबई : (britain school syllabus for muslim students) ब्रिटनमधील काही नामांकित शाळा मध्यपूर्वेत गेल्यानंतर त्यांना काही वादग्रस्त बाबी शिकवाव्या लागत असल्याचा आरोप समोर आला आहे. 'द टेलिग्राफ'ने अनेक महिन्यांच्या तपासानंतर काही धक्कादायक बाबी आपल्या अहवालात मांडल्या आहेत. ब्रिटनमधील काही शाळा, ज्यामध्ये हॉरो स्कूलचाही समावेश आहे, त्या मध्यपूर्वेत विस्तारल्या आहेत. या शाळांमध्ये ब्रिटिश मूल्यांऐवजी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी कुराणाशी संबंधित अभ्यासक्रम शिकवला जात असून, पती-पत्नी संबंधांबाबत वादग्रस्त शिकवण दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
दि. २ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात काही पुस्तकांतील उतारे देण्यात आले आहेत, ज्यात पत्नी आज्ञा पाळत नसेल तर पतीने काय करावे याचे वर्णन आहे. या धड्यांमध्ये प्रथम समज देणे, नंतर वेगळे झोपणे आणि शेवटी “हलके मारणे” असा क्रम दिला असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामध्ये चेहऱ्यावर मारण्यास मनाई असून हलक्या वस्तूने मारण्याचा उल्लेख असल्याचेही सांगितले गेले आहे. मात्र यावेळी हेही स्पष्ट करण्यात आलेय की, हा अभ्यासक्रम फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी यूएई सरकारने निश्चित केलेले नैतिक शिक्षणाचे स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी त्यांची नागरिकत्व व धर्म याची माहिती देणे बंधनकारक असल्याचेही नमूद आहे.
 
या अभ्यासक्रमात वैवाहिक तणाव कसा हाताळायचा याबाबतही माहिती देण्यात आली आहे. काही उदाहरणांमध्ये “पत्नीच्या मागण्या” किंवा “पतीची कंजूष वृत्ती” यांसारख्या कारणांचा उल्लेख आहे.(britain school syllabus for muslim students) अहवालानुसार, एका ठिकाणी असा प्रश्न विचारण्यात आला आहे की इस्लाममध्ये तलाकाचा अधिकार प्रामुख्याने पुरुषांना का दिला आहे, आणि त्यासाठी “पुरुष अधिक संयमी असतो” हा पर्याय देण्यात आला आहे.
 
या अहवालानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाल्या असून ब्रिटिश शाळा त्यांच्या मूळ मूल्यांपासून दूर जाताहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दुसरीकडे, काहींचे मत आहे की कोणत्याही देशात कार्यरत असताना त्या देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचा आदर करणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिकीकरणाच्या काळात शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक मूल्ये आणि स्थानिक परंपरा यांच्यात संतुलन कसे साधायचे, हा महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (britain school syllabus for muslim students)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक