Rajabhau Nene Smruti Puraskar : अंजली तागडे, विराग पाचपोर यांना 'राजाभाऊ नेने' पुरस्कार जाहीर!
07-Apr-2026
Total Views |
पुणे : (Rajabhau Nene Smruti Puraskar) साप्ताहिक 'विवेक'चे माजी संपादक कै.राजाभाऊ नेने यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा या वर्षाचा 'राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार' (Rajabhau Nene Smruti Puraskar) ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि 'विश्व संवाद केंद्र'च्या संपादक अंजली तागडे यांना जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.पुरस्कार वितरण सोहळा सोमवार,दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता चंचल स्मृती, वडाळा (मुंबई) येथे पार पडणार आहे.(Rajabhau Nene Smruti Puraskar)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांच्या हस्ते हे पुरस्कार (Rajabhau Nene Smruti Puraskar) प्रदान केले जातील.स्मृतिचिन्ह,शाल, श्रीफळ आणि २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे (Rajabhau Nene Smruti Puraskar) स्वरूप आहे.याच कार्यक्रमात पद्मश्री रमेश पतंगे लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रतीक कर्पे आणि मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे संचालक प्राचार्य डॉ बळीराम गायकवाड यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित होईल.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन 'विवेक' पुस्तक विभागाचे व्यवस्थापक शीतल खोत यांनी केले आहे.(Rajabhau Nene Smruti Puraskar)