८ एप्रिलपासून Air Indiaचा प्रवास महागणार! फ्यूल सरचार्जमध्ये केली वाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री

    07-Apr-2026   
Total Views |
Air India Fuel Surcharge

मुंबई : (Air India Fuel Surcharge)
जागतिक स्तरावर विमान इंधनाच्या किमतीत जवळपास १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यानंतर एअर इंडियाने आपल्या फ्यूल सरचार्जमध्ये वाढ केली आहे. नवे दर ८ एप्रिलपासून म्हणजेच रात्री १२ वाजल्यानंतर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, दोन्ही मार्गांवरील विमानप्रवास महाग होण्याची शक्यता आहे. (Air India Fuel Surcharge)
 
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) दरवाढ २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) महागल्यामुळे जगभरातील विमान कंपन्यांच्या ऑपरेशनल खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, एअर इंडियाने हा सरचार्जवाढीचा निर्णय घेतला आहे. (Air India Fuel Surcharge)
 
कशी होणार दरवाढ?

नवीन दर (देशांतर्गत विमान प्रवासासाठी) - ८ एप्रिलपासून
  • ० ते ५०० किमी: २९९ रुपये
  • ५०१ ते १,००० किमी: ३९९ रुपये
  • १,००१ ते १,५०० किमी: ५४९ रुपये
  • १,५०१ ते २,००० किमीः ७४९ रुपये
  • २,००० किमी पेक्षा जास्तः ८९९ रुपये
नवीन दर (आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी) - १० एप्रिलपासून
  • SAARC देश (बांगलादेश वगळून) - $२४(सुमारे ₹२,०००) प्रति सेक्टर
  • पश्चिम आशिया / मध्य पूर्व - $५०(सुमारे ₹४,२००) प्रति सेक्टर
  • चीन आणि आग्नेय आशिया (सिंगापूर वगळून) - $१०० (सुमारे ₹८,३००) प्रति सेक्टर
  • उत्तर अमेरिका व ऑस्ट्रेलिया - $२८० (सुमारे ₹२३,४००) प्रति सेक्टर
  • युरोप व यूके - $२०५ (सुमारे ₹१७,०००) प्रति सेक्टर
  • आफ्रिका व मध्य आशिया - $१३० (सुमारे ₹१०,८००) प्रति सेक्टर
  • सिंगापूर - $६० प्रति सेक्टर
आधीच बुक केलेल्या तिकिटांबाबत दिलासा

एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, ८ किंवा १० एप्रिलपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर नवीन सरचार्ज लागू होणार नाही. मात्र, प्रवासाची तारीख किंवा मार्ग बदलल्यास नवीन दर लागू होतील.(Air India Fuel Surcharge)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\