मुंबई : (US-Iran War) अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढताना दिसत असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेल्या अंतिम इशाऱ्यानंतर, आता दोन्ही देशांत ४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी गुप्त चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चा यशस्वी होण्याची शक्यता कमी असली तरी सध्या जोरदार वाटाघाटी सुरु असल्याची गुप्त माहिती 'अॅक्सिऑस'ला वृत्तसंस्थेला मिळाली आहे. (US-Iran War)
अॅक्सिऑस वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कीये हे देश मध्यस्थीचे प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचे दूत स्टीव विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात थेट संदेशांची देवाणघेवाण होत आहे. दरम्यान, सध्याच्या चर्चेत असलेल्या आराखड्यात दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात ४५ दिवसांची युद्धबंदी लागू केली जाईल. तर, दुसऱ्या टप्प्याचे उद्दिष्ट युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी व्यापक चर्चा केली जाणार आहे. पण, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणे, इराणच्या अतिसंवर्धित युरेनियमचा साठा यावरुन अद्याप मतभेद असल्याचे मध्यस्थींचे मत आहे. (US-Iran War)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटममुळे या चर्चेला यश मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे या विषयाशी निगडीत अधिकाऱ्यांनी 'अॅक्सिऑस'ला सांगितले. पण, युद्धाचा मोठा भडका उडण्यापूर्वी ते टाळण्याचा हा 'अंतिम प्रयत्न' असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (US-Iran War)