Amrit Bharat Express : अमृत भारत ट्रेनचे लक्झरियस कोच

अमृत भारत एक्सप्रेससाठी नवे आधुनिक कोच तयार; नमुना कोच सादर

Total Views |
Amrit Bharat Express
 
नवी दिल्ली : (Amrit Bharat Express) भारतीय रेल्वेने अमृत भारत एक्सप्रेससाठी (Amrit Bharat Express) विकसित केलेल्या नव्या आधुनिक डब्यांचे अंतर्गत डिझाइन आणि रंगसंगती असलेल्या नमुना कोचची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली. सर्वसामान्यांना कमी खर्चात उत्तम प्रवासी आनंद देण्यासाठी आता संपूर्ण भारतीय बनावटीच्या रेल्वे गाड्या सज्ज झाल्या आहेत.(Amrit Bharat Express)
 
अमृत भारत एक्सप्रेसचे (Amrit Bharat Express) नवीन कोच प्रवाशांच्या आरामात वाढ, आकर्षकता आणि एकूण प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी हे विशेषतः डिझाइन करण्यात आले आहेत. कोचच्या आतील भागात आधुनिक आणि सुसंगत रंगसंगती वापरण्यात आली असून, पीव्हीसी फ्लोअरिंग, आसन व बर्थचे कव्हर (रेक्सिन), स्नॅक टेबल, पडदे आणि स्वच्छतागृह यामध्ये एकसंध रंगांचा वापर करण्यात आला आहे.(Amrit Bharat Express)
 
या कोचमध्ये वापरलेले सर्व साहित्य एच एल 3 अग्निसुरक्षा मानकांनुसार असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची उच्च पातळी सुनिश्चित करण्यात आली आहे. आकर्षकतेसोबतच टिकाऊपणा आणि देखभालीची सुलभता यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्याच्या उद्दिष्टाचा हा भाग आहे.(Amrit Bharat Express)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.