Baramati By-Election : बारातमतीच्या निवडणूकीत काँग्रेसची सर्वात मोठी हार होणार

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सुनेत्रा पवार सर्व रेकॉर्ड तोडून विजयी होतील

    06-Apr-2026   
Total Views |
Baramati by-election
 
मुंबई : (Baramati By-Election) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रातील सर्व रेकॉर्ड तोडून त्या प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि काँग्रेसने ही निवडणूक लढल्यास बारातमीत (Baramati By-Election) त्यांचा सर्वात मोठा पराभव होईल, असा विश्वास महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.(Baramati By-Election)
 
बारामती पोटनिवडणूकीसाठी (Baramati By-Election) सोमवारी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.(Baramati By-Election)
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "काँग्रेसने महाराष्ट्राचे संस्कार जपायला हवे. अजित पवार यांनी त्यांचे ८० टक्के आयुष्य काँग्रेस नेत्यांच्या सहवासात घालवले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वाच्या पदावर काम केले. त्यामुळे काँग्रेसने इतक्या लवकर त्यांना विसरू नये. त्यांनी ही निवडणूक लढवण्याची जिद्द करू नये आणि ही निवडणूक बिनविरोध करावी, हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे. याऊपरही काँग्रेसची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यास बारामतीकर जनता तुमचा सर्वात मोठा पराभव करेल."(Baramati By-Election)
 
काँग्रेस पक्ष एकटा पडला
 
"ही लढाई महायुतीमध्ये नसून तर अजितदादांच्या जागेची निवडणूक आहे. महाविकास आघाडीच्या अनेक लोकांनी सुनेत्रा पवार यांना समर्थन दिल्याने काँग्रेस एकटा पडला आहे. निवडणूक लढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उघडा पडला आहे. असे असताना काँग्रेसला हीच निवडणूक का लढायची आहे? ही निवडणूक लढवून ते काय सिद्ध करू पाहत आहेत?" असा सवालही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.(Baramati By-Election)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....