Ashish Shelar : मुंबईत रंगणार ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव

मंत्री अॅड. आशिष शेलार; १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आयोजन

    06-Apr-2026   
Total Views |
Chitrapataka Film Festival

मुंबई : (Ashish Shelar) राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव (Ashish Shelar) यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.(Ashish Shelar)
 
मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे पार पडलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी याबद्दलची माहिती दिली. यावेळी बैठकीस विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, उपसचिव नंदा राऊत तसेच उपसचिव महेश वाव्हळ उपस्थित होते.(Ashish Shelar)
 
मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, "राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत गेल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव (Ashish Shelar) सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या महोत्सवाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर यंदा चार दिवसांचा हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करावा," असे निर्देश त्यांनी दिले.(Ashish Shelar)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....