Through Formation Treatment : आसवली-पडळी मार्गावरील वेगमर्यादा हटवली; भुसावळ विभागात रेल्वेगाड्यांचा वेग आणि सुरक्षितता वाढणार

‘थ्रू फॉर्मेशन ट्रीटमेंट’ हे आव्हानात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण, ७५ किमी प्रतितासची कायमस्वरूपी वेगमर्यादा हटविली

Total Views |
Through Formation Treatment
 
मुंबई : (Through Formation Treatment) मध्य रेल्वेने प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणाच्या उपक्रमांतर्गत भुसावळ विभागातील आसवली-पडळी दरम्यानच्या मार्गावर मोठे यश मिळवले आहे. या मार्गावरील कायमस्वरूपी वेगमर्यादा हटवण्यात आल्याने आता गाड्यांची सुरक्षितता आणि वेग दोन्ही वाढणार आहेत.(Through Formation Treatment)
 
आसवली-पडळी विभागातील अप लाईनवर ‘थ्रू फॉर्मेशन ट्रीटमेंट’ (Through Formation Treatment) हे आव्हानात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. या मार्गावरील सुमारे ८०० मीटर पट्ट्यावर अनेक वर्षांपासून ૭५ किमी प्रतितास वेगमर्यादा लागू होती. विशेषतः पावसाळ्यात या भागावर सातत्याने लक्ष ठेवावे लागत होते. हा विभाग अर्ध घाट परिसरात असून येथे पोहोच मर्यादित आहे.(Through Formation Treatment)
 
ट्रॅकची उंची सुमारे ९ मीटर असून २.२६ अंशाचा वळण असल्यामुळे काम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. या सर्व बाबींचा विचार करून २०२५च्या पावसाळ्यानंतर हे काम हाती घेण्यात आले. हे काम ‘कट अँड कव्हर’ पद्धतीने करण्यात आले. यासाठी ४ एक्स्कॅव्हेटर, २ जेसीबी, ३ हायड्रा क्रेन, १ व्हायब्रेटरी रोलर आणि पाण्याचे टँकर यांचा वापर करण्यात आला. एकूण ३३ ट्रॅफिक ब्लॉक्समध्ये प्रत्येकी सरासरी २ तास ३० मिनिटे कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले.(Through Formation Treatment)
 
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी व अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विभागीय कर्मचारी आणि २५ कंत्राटी कामगारांचा समावेश होता. अत्यंत मेहनतीने हे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले. या कामाच्या यशस्वी पूर्णतेनंतर ૭५ किमी प्रतितासची कायमस्वरूपी वेगमर्यादा हटवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्यांचा वेग वाढणार असून, रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होणार आहे. (Through Formation Treatment)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.