मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) व्यक्ती आणि कुटुंबाचे जीवन राष्ट्रहिताशी सुसंगत असले पाहिजे. केवळ चांगला माणूस असणे पुरेसे नाही, तर आपल्या गुणांचा उपयोग देशासाठी झाला पाहिजे. कोणतीही व्यक्ती किंवा कुटुंब वेगळे राहून आनंदी राहू शकत नाही. देश सुरक्षित असेल तरच प्रत्येकाचे जीवन सुखकर होते", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohanji Bhagwat) यांनी केले.
केरळातील कोची येथे ‘सुवर्णामृतम्’ या बालगोकुलमच्या सुवर्णमहोत्सवी समारोपानिमित्त आयोजित ‘बाल नेतृ शिबिरा’च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठीवर बालगोकुलमचे राज्याध्यक्ष आर. प्रसन्नकुमार, सीमा जागरण मंचाचे अखिल भारतीय संरक्षक ए. गोपालकृष्णन, करिअर गुरु डॉ. पी. आर. वेंकटरामन, स्वागत समिती अध्यक्ष टी. एस. पट्टाभिरामन, राज्य भगिनी प्रमुख स्मिता वल्सलन, राज्य बालसमिती अध्यक्षा शिवान्या एस. प्रदीप आणि कोझिकोड जिल्हा सचिव आदिकेशवन उपस्थित होते.(Dr. Mohanji Bhagwat)
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक (Dr. Mohanji Bhagwat) पुढे म्हणाले, भारत ‘विश्वगुरू’ तेव्हाच बनेल, जेव्हा सर्वजण एकत्रित प्रयत्न करतील. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलताना सर्वांनी आपल्या काठ्यांनी प्रयत्न केल्यानंतरच आपले करंगळी पुढे केली. आपण स्वतः प्रगती केली पाहिजे, पण त्याच वेळी राष्ट्रासाठीही कार्य केले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण यांनी जगाच्या कल्याणासाठी कष्ट आणि दुःख स्वीकारले. त्यांचा जन्म कारागृहात झाला, लहानपणीच आई-वडिलांपासून दूर राहावे लागले. जगाच्या हितासाठी त्यांनी पांडवांच्या बाजूने उभे (Dr. Mohanji Bhagwat)राहत त्यांना युद्धात मार्गदर्शन केले. त्यांनी वैयक्तिक सुखाचा विचार न करता संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी अर्पण केले.
पुढे सरसंघचालकांनी (Dr. Mohanji Bhagwat) नमुद केले की, आज भारतीयांना जगभरात सन्मान मिळत आहे आणि भारत एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांच्या भूमीत जाऊन त्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपण प्राप्त केली आहे. अमेरिकेत एका नाटकात नेहरूंची भूमिका करणारा कलाकार केनेडीसमोर विनंती करताना दाखवला गेला आणि प्रेक्षकांनी त्यावर हशा केला होता. ती दयनीय परिस्थिती आता उरलेली नाही. आपण जगासमोर ठामपणे उभे राहिले पाहिजे. काश्मीरमधील लोक एकेकाळी संपन्न आणि बुद्धिमान होते, पण त्यांना आपले घरदार सोडून जावे लागले. यावरून केवळ ‘चांगले’ असणे पुरेसे नाही, तर समाजासाठी उभे राहणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होते.(Dr. Mohanji Bhagwat)
विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी सांगितले की, या देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. “पुढील दहा-पंधरा वर्षांत तुम्हीच देशाचे नेतृत्व करणार आहात. सद्गुण जीवनात उतरवले पाहिजेत. केवळ हातात दिवा असणे पुरेसे नाही, तर त्या प्रकाशाच्या दिशेने चालले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. चंचलता नसावी. दृढ मनाने चांगला माणूस राहिले पाहिजे. हीच खरी तपस्या आहे. अहंकार आणि द्वेष बाजूला ठेवून पुढे चला,” असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.(Dr. Mohanji Bhagwat)
संकटसमयी राष्ट्राचे रक्षण हे आपले कर्तव्य!
आपली संस्कृती कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. चुकीच्या कृतींबद्दल लाज वाटण्याची भावना असावी. कठीण प्रसंगातही जीवनातील सद्गुण टिकवले पाहिजेत. धर्मरक्षणासाठी जीवन अर्पण करणाऱ्यांची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. भारतमातेची सुरक्षा राखणे आणि संकटसमयी राष्ट्राचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याचबरोबर राष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्याची जबाबदारीही आपलीच आहे. असे सरसंघचालकांनी नमुद केले.(Dr. Mohanji Bhagwat)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक