The Guardian Controversy : न्यू जर्सी अक्षरधाम मंदिरावर पुन्हा आरोपांची धूळफेक!

अमेरिकन चौकशीत ‘क्लीन चिट’ मिळूनही ‘द गार्डियन’कडून जुन्याच मुद्द्यांची पुनरावृत्ती

    06-Apr-2026   
Total Views |
The Guardian Controversy
 
मुंबई : (The Guardian Controversy) ब्रिटनमधील 'द गार्डियन' (The Guardian Controversy) या वृत्तपत्राने न्यू जर्सीमध्ये उभारण्यात आलेल्या बॅप्स स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर संदर्भात जुने आरोप पुन्हा उपस्थित करणारा एक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालानंतर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटल्याचे पाहायला मिळतेय. मात्र, अमेरिकेतील न्यायालयाने सप्टेंबर २०२५ मध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोणतीही गैरप्रकाराची नोंद आढळली नसल्याचे स्पष्ट केले होते. या अहवालात मंदिराच्या बांधकामादरम्यान कामगारांशी गैरवर्तन झाल्याचा आणि वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, हे तेच आरोप आहेत, ज्यांची चौकशी अमेरिकन यंत्रणांनी यापूर्वीच करून त्यांना फेटाळले आहे.(The Guardian Controversy)
 
न्यू जर्सीतील रॉबिन्सविल येथे उभारलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक मानले जाते. २०२३ मध्ये पूर्ण झालेले हे मंदिर केवळ उपासनेचे ठिकाण नसून जागतिक हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि अभिमानाचे प्रतीक आहे. या मंदिराची खासियत म्हणजे त्याच्या निर्मितीत झालेला व्यापक लोकसहभाग. सुमारे १२ वर्षांच्या कालावधीत उत्तर अमेरिका आणि इतर देशांतील १२,५०० हून अधिक स्वयंसेवकांनी एकत्र येऊन हे मंदिर उभारले. विशेष म्हणजे, यातील अनेकांना बांधकामाचा व्यावसायिक अनुभव नव्हता. मात्र, मंदिर प्रशासनाच्या मते त्यांनी हे कार्य ‘सेवा’ भावनेतून केले.(The Guardian Controversy)
 
'द गार्डियन' च्या अहवालात मंदिराच्या भव्यतेमागे ‘अंधारी बाजू’ असल्याचा दावा करत कामगार शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. २०१५ ते २०२३ या काळात कामगारांना गैरवर्तन, व्हिसा अनियमितता आणि उपचारांतील दुर्लक्ष यांना सामोरे जावे लागल्याचा दावा करण्यात आलाय. काही कामगारांच्या मृत्यूचे कारण सिलिकोसिस असल्याचा आरोपही करण्यात आला असून, धुळीमुळे उद्भवणाऱ्या या फुफ्फुसरोगामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच काही कामगारांना टीबी आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिससारख्या आजारांचा सामना करावा लागल्याचेही नमूद केले आहे.(The Guardian Controversy)
 
अहवालानुसार, काही कामगारांकडून आठवड्याला ९० तासांपर्यंत काम करून घेतले जात होते आणि त्यांना अत्यल्प वेतन दिले जात होते. पासपोर्ट जप्त करणे, कुटुंबीयांशी संपर्कावर निर्बंध आणणे, तसेच सुरक्षात्मक साधनांचा अभाव असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. मंदिर व्यवस्थापनाने हे सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी सर्व कामे कायदेशीर आणि धार्मिक परंपरेनुसार केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी अमेरिकेतील ‘मिनिस्ट्रियल एक्सेप्शन’ या कायद्याचा दाखला देत धार्मिक संस्थांना त्यांच्या अंतर्गत कार्यात स्वायत्तता असल्याचे सांगितले.(The Guardian Controversy)
 
२०२१ मध्ये काही कामगारांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुमारे चार वर्षे चौकशी चालली, मात्र कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याने कारवाई न करता केस बंद करण्यात आला. हा निर्णय बॅप्स स्वामीनारायण संस्थेसाठी मोठा दिलासा मानला गेला.(The Guardian Controversy)
 
‘कामगार’ नव्हे स्वयंसेवक
 
बॅप्स स्वामीनारायण संस्थानच्या मते, बांधकामात सहभागी झालेले लोक ‘कामगार’ नसून स्वयंसेवक होते आणि त्यांनी श्रद्धेने सेवा केली. काही तक्रारदारांनी नंतर स्वतःच खटल्यातून माघार घेतली आणि त्यांना दिशाभूल करण्यात आल्याचे सांगितले, असेही संस्थेने नमूद केले.(The Guardian Controversy)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक