मुंबई : (Udhayanidhi Stalin) निवडणुका डोक्यावर आल्या की राजकारणातल्या भूमिकांचे रंग क्षणार्धात बदलताना दिसतात. तामिळनाडूतही त्याचाच प्रत्यय आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एम.के.स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन (Udhayanidhi Stalin) जे कालपर्यंत सनातन धर्माचा अपमान करत त्याची तुलना डेंगू-मलेरियाशी करत होते, ज्यांनी सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली होती; तेच आज मंदिरोमंदिर फिरत ‘भक्ती’चा आव आणताना दिसत आहेत.(Udhayanidhi Stalin)
उदयनिधी स्टालिन अनेकदा सांगत आले आहेत की ते पूजा-पाठ करत नाहीत. मात्र, अलीकडे ते त्यांच्या मतदारसंघातील सेंजेनियमन मंदिरात पूजा करताना दिसले. त्यांच्या सोबत खासदार दयानिधी मारनही उपस्थित होते. पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार डॉ. सेंथिल कुमार हेही पारंपरिक पूजा-अर्चनेच्या विरोधात बोलत आलेत. त्यांनी रस्ते प्रकल्पादरम्यान होणाऱ्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. मात्र आता तेही मंदिरांमध्ये दर्शन घेताना दिसतायत. प्रत्यक्षात डीएमके या निवडणुकीत ‘हिंदुत्वाविषयी मवाळ भूमिका’ घेत बहुसंख्य हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.(Udhayanidhi Stalin)
हा बदल महत्त्वाचा यासाठीही आहे की, भाजपने अन्नामलाई यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे. एआयएडीएमके आणि इतर छोट्या पक्षांसोबत मिळून एनडीए आघाडी डीएमके-काँग्रेस आघाडीला टक्कर देण्यास सज्ज आहे. त्यामुळे डीएमकेला आपला मतदारवर्ग टिकवण्यासाठी ‘धार्मिक संतुलन’ साधावे लागत आहे.(Udhayanidhi Stalin)
सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी कोणतीही भूमिका घेण्यास तयार असतात, असे म्हटले जाते. डीएमके नेते उदयनिधी स्टालिन (Udhayanidhi Stalin) हे त्याचे ताजे उदाहरण मानले जात आहे. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट केले होते की त्यांचा पूजा-पाठावर विश्वास नाही आणि ते सनातन धर्माच्या विरोधात आहेत. त्यामुळे मंदिरात जाऊन छायाचित्रे काढून ती प्रसिद्ध करणे, हा केवळ निवडणूकपूर्व दिखावा असल्याची टीका सध्या होत आहे.(Udhayanidhi Stalin)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक