Delhi Assembly : दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत मोठी चूक! VIP गेट तोडून कारचा आत प्रवेश; परिसरात खळबळ

    06-Apr-2026   
Total Views |

Delhi Assembly

मुंबई : (Delhi Assembly)
दिल्ली विधानसभेच्या परिसरात सोमवारी ६ एप्रिलला दुपारी एका अज्ञात कारने अचानक व्हीआयपी गेट तोडून आत प्रवेश केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मात्र, यानंतर ती कार घटनास्थळावरून काही वेळातच दिसेनाशी झाली. दरम्यान, एक अज्ञात कार दिल्ली विधानसभेच्या परिसरात का आली? या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत. (Delhi Assembly)

फुलांचा गुच्छ, शाई... अन् चालक फरार

प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशची नोंदणी क्रमांक प्लेट असलेल्या वाहनाने गेट क्रमांक २ मधून प्रवेश केला, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. दिल्ली सचिवालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, "चालक विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने गेला आणि मागे फिरण्यापूर्वी त्याने व्हरांड्याजवळ फुलांचा गुच्छ ठेवला." त्यांनी पुढे सांगितले की, चालकाने अध्यक्षांच्या गाडीवर शाईसुद्धा फेकली. बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुष्पगुच्छात कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.  (Delhi Assembly)
 
वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे अत्यंत संरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या विधानसभा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेच्या पर्याप्ततेवर या घटनेमुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कडक सुरक्षा नियमावली असूनही, वाहनाने अडथळा तोडून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश कसा केला, याची तपासणी अधिकारी करत होते. वाहनाची ओळख पटवण्यासाठी आणि घटनाक्रमाची पाहणी कऱण्यासाठी विविध प्रवेशद्वारांवरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाण्याची शक्यता आहे. (Delhi Assembly)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\