Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिर येथे ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळा’ची स्थापना

    06-Apr-2026   
Total Views |
Kashi Vishwanath Temple
 
मुंबई : (Kashi Vishwanath Temple) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ३ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) येथे अर्पण करण्यासाठी एक भव्य घड्याळ दिले. जे दि. ४ एप्रिल रोजी मंदिर परिसरात पूर्ण श्रद्धा आणि विधीपूर्वक तिची स्थापना करण्यात आले. देशातील सर्व ज्योतिर्लिंग आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर येथेही वैदिक घड्यांची स्थापना करण्याच्या मध्य प्रदेश सरकारच्या संकल्पाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या संदर्भात जनसंपर्क अधिकारी अनुराग उइके यांनी रविवारी माहिती दिली.(Kashi Vishwanath Temple)
 
ते म्हणाले, उज्जैन येथील महाराजा विक्रमादित्य शोधपीठ यांनी विकसित केलेले हे घड्याळ केवळ वेळ दाखवणारे साधन नसून भारताच्या प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाचे डिजिटल पुनर्जागरण आहे. हे घड्याळ सूर्योदयावर आधारित कार्य करते आणि एका दिवसाचे ३० मुहूर्तांत विभाजन करते. त्याचे वैशिष्ट म्हणजे, स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आधारे अचूक वेळ मोजणे. या घड्याळामुळे श्रद्धाळू आणि युवा पिढीला भारतीय प्रमाण वेळ सोबतच पंचांग, तिथी, योग, नक्षत्र, भद्रा स्थिती आणि ग्रहांच्या गोचरांची माहितीही मिळणार आहे.(Kashi Vishwanath Temple)
 
हेही वाचा : The Guardian Controversy : न्यू जर्सी अक्षरधाम मंदिरावर पुन्हा आरोपांची धूळफेक!
 
जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश सरकार सांस्कृतिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानासोबत जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. हे वैदिक घड्याळ भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडत तरुणांना आपल्या परंपरांकडे वळण्याची प्रेरणा देईल.(Kashi Vishwanath Temple)
 
पहिले वैदिक घड्याळ उजैनमध्ये
 
मध्य प्रदेश शासनाच्या संस्कृती विभागांतर्गत महाराजा विक्रमादित्य शोधपीठ, उज्जैन यांनी भारतीय कालगणनेवर आधारित जगातील पहिली ‘विक्रमादित्य वैदिक घडी’ उज्जैनमध्ये स्थापित केली आहे. हे घड्याळ प्राचीन भारतीय कालगणना पद्धतीचे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पुनर्स्थापन करणारा अभिनव उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ फेब्रुवारी २०२४ रोजी या घड्याळाचे लोकार्पण करण्यात आले होते.(Kashi Vishwanath Temple)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक