मुंबई : (M2M Princess) मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आली असल्याबाबत सुरु असणाऱ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. ही सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आली नसून जहाजामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याबाबत सांगण्यात आले आहे.(M2M Princess)
दरम्यान, मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवा दि. १ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. एमटूएम फेरीज् प्रा. लि. कंपनीच्या “एम टू एम प्रिन्सेस” या जहाजाद्वारे चालविण्यात येणाऱ्या या सेवेच्या माध्यमातून मुंबईहून विजयदुर्ग येथे केवळ ६ ते ૭ तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. या फेरीसेवेच्या आतापर्यंत एकूण ६ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत.(M2M Princess)
सहाव्या फेरीदरम्यान विजयदुर्गहून मुंबईकडे परत येत असताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे जहाजाच्या एकूण ४ इंजिनांपैकी सध्या केवळ १ इंजिन कार्यरत असून उर्वरित ३ इंजिनांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या अनपेक्षित तांत्रिक बिघाडामुळे ही फेरीसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.(M2M Princess)
इंजिन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सुटे भाग परदेशातून मागविण्यात आले आहेत. तथापि, मध्य-पूर्व आशियातील युद्ध परिस्थितीमुळे त्यांच्या पुरवठ्यात काहीसा विलंब होत आहे. अंदाजे १५ दिवसांत हे सुटे भाग प्राप्त होतील, त्यानंतर इंजिन दुरुस्तीसाठी सुमारे १० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.(M2M Princess)
जहाजाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणांकडून एम टू एम प्रिन्सेसची तपासणी (M2M Princess) करून ते प्रवासासाठी योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात येईल. त्यानंतरच वाहतूक सेवा पुन्हा कार्यान्वित केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देऊन, नियमांनुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ जहाजाच्या दुरुस्तीच्या कामावर सातत्याने देखरेख ठेवून आहे, अशी माहिती मंडळाने दिली आहे.(M2M Princess)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.