मुंबई : (Dindoshi Communal Violence) गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. येथे निघालेल्या मरीयम मातेच्या शोभायात्रेदरम्यान धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर धारधार शस्त्रांनी हल्ला झाल्याचे निदर्शनास येत आहे. या हल्ल्यात तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. तर १५ ते २० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सदर प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी १० आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.(Dindoshi Communal Violence)
मिळालेल्या माहितीनुसार, मरीयम मातेची शोभायात्रा सुरू असताना हिंदू बांधवांनी भाविकांसाठी सेवा कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पच्या माध्यमातून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पाणी वाटपासह विविध सेवा दिल्या जात होत्या. याच दरम्यान प्रभू श्रीरामांचे गाणे वाजवण्यात आले असता काही स्थानिक धर्मांध मुस्लिमांनी त्यास विरोध केला. हिंदू कार्यकर्त्यांनी हा विरोध न जुमानता गाणे सुरूच ठेवले. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि संबंधित धर्मांधांनी धारधार शस्त्रांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून १५ ते २० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.(Dindoshi Communal Violence)
घटनेनंतर बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र भूमिका घेतली. धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.(Dindoshi Communal Violence)
परिसरातील तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता. या हिंसक घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवून दोन्ही गटांतील मुख्य उपद्रवी घटकांची धरपकड सुरू केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पार्श्वभूमी तपासत असताना, त्यांनी दिंडोशी परिसरात उभारलेली निवासस्थाने ही पूर्णपणे अनधिकृत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार, सोमवारी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई करण्यात आली.(Dindoshi Communal Violence)
सध्या दिंडोशी परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात असून परिस्थिती शांत असली तरी तणाव कायम आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Dindoshi Communal Violence)
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अनधिकृत बांधकामांमध्ये राहून शांतता भंग करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका भाजप नेते किरीट सोमय्या मांडली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली रणनीती स्पष्ट केलीय. याप्रसंगी सामुहिक हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले.(Dindoshi Communal Violence)
आरोपींच्या घरातून सापडले 'ड्रग्स'
आरोपींच्या अवैध बांधकाम असलेल्या घरातून अंमली पदार्थ (ड्रग्स) सापडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित ठिकाण हे केवळ घर नसून अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप बजरंग दल कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरीया यांनी केलाय.(Dindoshi Communal Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक