मुंबई : (Mumbai Metro) मुंबई महानगरात नव्याने सुरू होत असलेल्या दोन मेट्रो मार्गीकांच्या पार्श्वभूमीवर दि. ८ एप्रिलपासून सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.(Mumbai Metro)
या अंतर्गत मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व – काशिगाव) आणि मेट्रो लाईन २बी (मंडाळे – डायमंड गार्डन, टप्पा १) या नवीन मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली असून हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. तसेच, मेट्रो लाईन २ए आणि लाईन ७ या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून, लाईन ७ ही लाईन ९ सोबत एकत्रितपणे चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.(Mumbai Metro)
मार्गिकानुसार सेवा तपशील
अ) मेट्रो लाईन २ए (पिवळी लाईन) अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व
• पहिली गाडी : सकाळी सुमारे ५:५० – ५:५५
• शेवटची गाडी: रात्री सुमारे १०:३५ – ११:००
• वारंवारता:
गर्दीच्या वेळेत: सुमारे ६ मिनिटे
इतर वेळेत: ८ ते १० मिनिटे
• एकूण फेऱ्या:
आठवड्याचे दिवस – २८९, शनिवार – २३१, रविवार – २१३
ब) मेट्रो लाईन ७ व लाईन ९ (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली ते काशिगाव
क) मेट्रो लाईन २बी (टप्पा १) महाराष्ट्र नगर – मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन, चेंबूर
लाईन २बी (टप्पा १) मुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळाली आहे.
• मार्ग लांबी: ५.३८ किमी
• पहिली गाडी : सकाळी ६:००
• शेवटची गाडी: रात्री सुमारे १०:१५ – १०:३०
• वारंवारता: सुमारे ९ मिनिटे ३० सेकंद
• एकूण फेऱ्या: २०९
इंटरचेंज सुविधा
दहिसर स्थानकावरून प्रवासी लाईन २ए आणि लाईन ७/९ दरम्यान सहज बदल करू शकतात, त्यासाठी स्टेशनबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.(Mumbai Metro)
प्रवाशांसाठी फायदे
• कमी प्रतीक्षा वेळ (६–१० मिनिटांत गाडी उपलब्ध)
• नव्या भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी
• अधिक जलद आणि थेट प्रवास
• सुलभ आणि समजण्यास सोपे
“मेट्रो लाईन २ए व लाईन ७ यांचे स्वतंत्र संचालन, तसेच लाईन ९ आणि लाईन २बी (टप्पा १) सुरू होणे हा मुंबई मेट्रोच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. या बदलांमुळे प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ होतील, प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि संपूर्ण नेटवर्क अधिक कार्यक्षम होईल. टप्प्याटप्प्याने आपण ३३७ किमी लांबीच्या एकात्मिक मेट्रो जाळ्याकडे वाटचाल करत आहोत आणि ‘मुंबई इन मिनिट्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत आहोत.”(Mumbai Metro)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.