Air India Suspends Tel Aviv Flights : इस्रायल-भारत विमान प्रवासाला ब्रेक! एअर इंडियाने फ्लाइट्स का थांबवल्या?

    06-Apr-2026   
Total Views |

Air India Suspends Tel Aviv Flights
 
मुंबई : (Air India Suspends Tel Aviv Flights) पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने नवी दिल्ली-तेल अवीव मार्गावरची आपली विमानसेवा ३१ मेपर्यंत स्थगित केली आहे. या निर्णयाचा परिणाम विमान कंपनीच्या नवी दिल्ली-तेल अवीव या थेट सेवेवर होणार असून, ही सेवा जवळपास दोन महिने खंडित राहील. (Air India Suspends Tel Aviv Flights)
 
बहुतांश प्रमुख विमान कंपन्यांनी तेल अवीव मार्गावरील सेवा स्थगित केली असून, केवळ इस्रायली विमान कंपन्या कडक निर्बंधांखाली सेवा चालवत आहेत. विमानसेवा स्थगित झाल्यामुळे इस्रायलमध्ये राहणाऱ्या ४० हजारांहून अधिक भारतीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी भारतात परत येण्याची इच्छा असलेल्या प्रवाशांना जॉर्डन किंवा इजिप्तमार्गे भूमार्गे प्रवास करावा लागतो. (Air India Suspends Tel Aviv Flights)

परिस्थितीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे या एअर इंडियाने स्पष्ट केले असून, परिस्थिती सुरक्षित असल्याचे निश्चित होताच आपली सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने या घडामोडीला दुजोरा दिला असून, प्रदेशातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उचललेले हे एक खबरदारीचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.(Air India Suspends Tel Aviv Flights)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\