Raghav Chadha: मैं घायल हुं इसलिये घातक हुं; चढ्ढानी सोशल मीडियाद्वारे दिला 'आप' ला इशारा

    05-Apr-2026
Total Views |
 
Raghav Chadha
 
मुंबई: (Raghav Chadha) मैं घायल हुं इसलिये घातक हुं असा अप्रत्यक्ष इशारा आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि आप च्या काही नेत्यांना यांना शनिवार दि. ४ एप्रिल रोजी आपल्या एक्स हँडलवरून दिला आहे. तर यावर हरियाणा मधील आपचे माजी पदाधिकारी नवीन जयहिंद म्हणतात," घातक चित्रपटातील एक मेसेज राघव चढ्ढा देण्याचा प्रयत्न करत आहेत की ते घातक चित्रपटातील काशिनाथ आहेत तर केजरीवाल कातिया आहेत." (Raghav Chadha)
 
खासदार राघव चढ्ढा यांना आम आदमी पक्षाने राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविल्यानंतर आपल्या एक्स हँडलवरून भावना व्यक्त करताना चढ्ढा लिहितात"मैं बोलना नहीं चाहता था, मगर चुप रहता तो बार-बार दोहराया गया झूठ भी सच लगने लगता." त्यांनी ३.२२ मिनिटांचा स्पष्टीकरणचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. (Raghav Chadha)
 
आम आदमी पक्षाची सुरुवात २०१२ साली झाली होती.त्यानंतर पक्षाला दिल्ली , पंजाब मध्ये सत्ता मिळत गेली पण प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, कुमार विश्वास, कपिल मिश्रा या मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला होता.दिल्ली विधानसभा वेळी देखील आप मधील अंतर्गत संघर्ष जोरावर होता अन् आता पंजाब विधानसभा निवडणुकीस एक वर्षापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना खासदार राघव चढ्ढा आणि आप मधील कलहाने पक्षात पुन्हा संघर्ष उफाळून आला आहे.यापूर्वी राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल नंतर आता राघव चढ्ढा देखील आपल्याच पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत."माझ्या विरोधात पक्षात एक पूर्व नियोजित मोहीम सुरू आहे सारखीच भाषा सारखीच विधाने सारखेच आरोप हा योगायोग नाही तर हा एक सामूहिक हल्ला आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा प्रत्येक खोटेपणा उघडकीस आणला जाईल." हे वक्तव्य राघव चढ्ढा यांनी केले आहे. (Raghav Chadha)
 
खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून आम आदमी पक्षाने नुकतेच हटविले होते.चढ्ढा यांच्यावर आप ने तीन आरोप देखील केले आहेत.शनिवार दि.४ रोजी एक व्हिडिओ शेअर करत चढ्ढा यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना सर्व आरोप खोडून काढले आहेत. नवीन उपनेता निवडलेले अशोक मित्तल यावर म्हणतात की ,"ही रूटीन प्रक्रिया आहे.नेते आणि पद बदलत असतात." हरियाणाचे पूर्व आप नेते नवीन जयहिंद आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हणतात, "माझा राघव चढ्ढा यांच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही, पण ते आमचे जुने सहकारी आहेत. राघव चढ्ढा यांनी दिल्ली आणि पंजाबमधील धनदांडग्यांची गुपितेही सांगितली पाहिजेत. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री निवासस्थानी राघव चड्डा यांना किती अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्यांना कशा प्रकारे जखमा झाल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यालाही दुखापत झाली होती, हे देखील त्यांनी सांगितले पाहिजे. राघव चढ्ढा यांनी सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्यांच्याकडे दिल्ली-पंजाबमधील मोठ्या धनदांडग्यांची गुपिते आहेत." (Raghav Chadha)