मुंबई : (Vidya Bharati Bhavan) "शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ भौतिक विकास नसून संवेदनशील आणि राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडविणे असावे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी मूल्याधारित शिक्षणाची आवश्यकता आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश सोनी यांनी केले.(Vidya Bharati Bhavan)
नवी दिल्ली येथे विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान यांच्या नव्याने बांधलेल्या ‘विद्या भारती भवन’चे (Vidya Bharati Bhavan) लोकार्पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सुरेश सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पूज्य आनंदमूर्ती गुरुमाँ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात वक्त्यांनी मूल्याधारित, मातृभाषा-आधारित, तंत्रज्ञान-सक्षम आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून ‘विकसित भारत २०४७’ घडविण्यात विद्या भारतीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.(Vidya Bharati Bhavan)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, आजच्या समाजात विद्या भारती हे एक प्रभावी, सशक्त आणि यशस्वी शैक्षणिक प्रयोग आहे. काळाची गरज ओळखून या संस्थेने सातत्याने स्वतःमध्ये बदल केले आहेत. भविष्यातील आव्हाने आणि संधी लक्षात घेऊन मूल्याधारित शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित, तंत्रज्ञान-सक्षम आणि नवोपक्रमकेंद्रित अभ्यासक्रमांचा स्वीकार करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थी जागतिक बदलत्या परिस्थितींशी सुसंगत राहू शकतील. ज्याप्रमाणे श्रीराम मंदिर राष्ट्राला दिशा देणारे केंद्र आहे, त्याचप्रमाणे ‘विद्या भारती’ शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Vidya Bharati Bhavan)
महामंत्री देशराज शर्मा यांनी सांगितले की, विद्या भारती ही आज देशातील सर्वात मोठ्या गैर-सरकारी शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. देशातील ६८४ जिल्ह्यांमध्ये २४,००० हून अधिक शाळा, ५९ महाविद्यालये आणि २ विद्यापीठांद्वारे सुमारे ३३ लाख विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले जात आहे. याशिवाय सेवा वस्त्या आणि ग्रामीण भागांमध्ये हजारो एकल विद्यालयांद्वारे शिक्षणाचा विस्तार केला जात आहे.(Vidya Bharati Bhavan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक