Radaroda Administration : राडारोडा व्यवस्थापनासाठी विभागनिहाय आराखडा तयार करा-अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांचे निर्देश

    30-Apr-2026
Total Views |
 
 
Radaroad Administration
 
मुंबई : (Radaroda Administration) मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे (सी अँड डी वेस्ट) योग्य व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२६ आणि ‘मुंबई क्लीन लीग’ प्रभावी करण्यासाठी अधिक काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांनी स्वच्छतेबाबत स्पष्ट आणि कडक निर्देश दिले.
 
नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे संकलन योग्यप्रकारे करणे आवश्यक असून प्रत्येक प्रशासकीय विभागाने स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करावा, असे जोशी यांनी सांगितले. या आराखड्यात अनधिकृतपणे राडारोडा टाकली जाणारी ठिकाणे, त्या ठिकाणी साचणारा कचरा आणि त्याची सद्यस्थिती याची सविस्तर माहिती समाविष्ट करणे बंधनकारक राहील. (Radaroda Administration)
 
हेही वाचा :  Growth Center TDR : ग्रोथ सेंटरचा टिडिआर कल्याण डोंबिवलीत वापरण्यास बंदी घालावी....
 
पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील स्वच्छतेच्या कामकाजाचा आढावा ‘एम पश्चिम’ आणि ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयात घेण्यात आला. यावेळी विविध विभागांतील स्वच्छतेची सद्यस्थिती, कचरा संकलन, अनुशेष, विशेष काळजीयोग्य कचरा, यांत्रिक स्वच्छता, मनुष्यबळ आणि वाहनांची उपलब्धता यांचा संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित उपायुक्त, सहायक आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते. (Radaroda Administration)
 
स्वच्छतेसाठी सकाळच्या सत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, तर पुढील सत्रात रस्ते स्वच्छता योजना किंवा पिंक आर्मीचा उपयोग करावा, असे निर्देश देण्यात आले. स्वच्छतेचे प्रभावी पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्रभेटी घ्याव्यात आणि यांत्रिकी स्वच्छता अधिक सक्षम करावी, असेही सांगण्यात आले. दीर्घकाळ अनुपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. (Radaroda Administration)