Pune Visa Case : टुरिस्ट व्हिसाचा गैरवापर! तीन अमेरिकन नागरिकांवर कारवाई

    30-Apr-2026   
Total Views |
Pune Visa Case
 
मुंबई: (Pune Visa Case) पुणे पोलिसांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून तीन अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याबाबत नोटीस बजावली असून दि. १० मे पर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती आहे की, हे तिघेही १९ ते २१ एप्रिलदरम्यान टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी धार्मिक प्रचार-प्रसार आणि शिक्षणाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभाग घेतला, जे टुरिस्ट व्हिसाच्या अटींविरुद्ध आहे.(Pune Visa Case)
 
पोलिस तपासात उघड झाले की, हे तिघे २६ एप्रिलच्या सायंकाळपासून पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि शहरातील विविध भागांत फिरत होते. २७ एप्रिलच्या सकाळी पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात त्यांनी एका खासगी कॅब चालकाला इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत छापलेले धार्मिक पत्रकं वाटली. या पत्रकांमध्ये बायबल आणि ख्रिश्चन धर्मासंबंधित माहिती देण्यात आली होती.(Pune Visa Case)
 
आरोप आहे की, या परदेशी नागरिकांनी चालकाला इतर धर्मांच्या तुलनेत ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगून त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कॅब चालकाने तेथे उपस्थित पोलिसांना माहिती दिली, जे त्यावेळी एका रॅलीच्या बंदोबस्तावर होते. माहिती मिळताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांचे पासपोर्ट, व्हिसा कागदपत्रे आणि इतर दस्तऐवजांची तपासणी केली. तपासादरम्यान त्यांच्या जवळ विविध भाषांतील मोठ्या प्रमाणात धार्मिक पत्रके आढळली.(Pune Visa Case)
 
 
यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना पुणे पोलिसांच्या विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात पाठवण्यात आले. तेथे झालेल्या तपासात त्यांनी टुरिस्ट व्हिसावर राहून धार्मिक प्रचारात सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे व्हिसा नियमांचे उल्लंघन झाले आहे. विदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी याची पुष्टी केली असून, व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे इमिग्रेशन आणि फॉरेनर्स कायद्यांतर्गत तिघा अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया नोटीस’ देण्यात आल्याचे सांगितले.(Pune Visa Case)
 
यापूर्वी जुलै २०२५ मध्येही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशाच प्रकारच्या प्रकरणात एका ४१ वर्षीय अमेरिकन नागरिकासह दोन जणांना अटक केली होती. त्यांच्यावर आर्थिक मदतीचे आमिष दाखवून लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता.(Pune Visa Case)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक