MHADA Mumbai : म्हाडा मुंबई मंडळाच्या विक्रोळीतील घरांच्या किमतीत घट

म्हाडाकडून महत्वपूर्ण निर्णय; कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्क्यांनी घट

Total Views |
 
Mhada Lottery
 
मुंबई : (MHADA Mumbai) म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर संगणकीय सोडत प्रणालीमधील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली आहे.
 
मुंबई मंडळातर्फे दि.३० मार्च, २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये संकेत क्रमांक ५३८, बिल्डींग नं. २ अ,ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई, ४८० सदनिकांची विक्री किमंत रु.१,४५,५८,३०७ ते रु.१, ४७, ९७, ९९२ व संकेत क्रमांक-५३९ बिल्डींग नं. ३ अ,ब,क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी, येथील ७४१ सदनिकांची विक्री किमंत रु. १,४५,७४,९४२ ते रु. १,४८,१४,९०१ अशी नमूद करण्यात आली आहे. (MHADA Mumbai)
 
या संकेत क्रमांकातील सदनिकांची विक्री किमंत प्रती सदनिका ७.५ टक्क्यांनी कमी करण्यात येत असून सुधारित किंमती पुढीलप्रमाणे आहेत: संकेत क्र.५३८, बिल्डींग नं. २ अ,ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई, ४८० सदनिकांची विक्री किमंत रु. १,३४,६६,४३४ ते रु. १,३६,८८ १४३ व संकेत क्रमांक ५३९ - बिल्डींग नं. ३ अ,ब,क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई येथील ७४१ सदनिकांची विक्री किमंत रु.१,३४,८१ ८२१ ते रु. १ सुधारीत करण्यात येत आहे. (MHADA Mumbai)
 
हेही वाचा :  Mata Ramai Maternity Home : “माता रमाई प्रसूतिगृहात तातडीने सुविधा वाढवा” : नगरसेविका आशा मराठे
 
या प्रकल्पातील सदनिकांना प्रती सदनिका ०१ वाहन तळ (पार्कीग) विना मुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला ३० मार्च रोजी सुरुवात करण्यात आली होती व अधिकाधिक नागरिकांना सोडत प्रक्रीयेत सहभाग घेता यावा याकरिता मंडळातर्फे १४ मे पर्यंत मुदत वाढ जाहीर करण्यात आली आहे. (MHADA Mumbai)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.