Mata Ramai Maternity Home : “माता रमाई प्रसूतिगृहात तातडीने सुविधा वाढवा” : नगरसेविका आशा मराठे
30-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mata Ramai Maternity Home) चेंबूर परिसरातील ‘माता रमाई प्रसूतिगृह’ येथील सुविधा तातडीने सुधारून सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबई मनपा वॉर्ड क्रमांक १५२च्या भाजपा नगरसेविका आशा मराठे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प अधिवेशन २०२६ दरम्यान सभागृहात केली.
‘माता रमाई प्रसूतिगृह’ (Mata Ramai Maternity Home) ची सध्याची अवस्था चिंताजनक असून परिसरातील महिलांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथे मोठे आणि सुसज्ज रुग्णालय उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०१७ पासून या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खासगी रुग्णालयांतील उपचारांचा खर्च सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना परवडत नसल्याने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Mata Ramai Maternity Home)
याशिवाय, संबंधित परिसरातील बस थांब्याला ‘माता रमाई’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी सभागृहात मांडली. (Mata Ramai Maternity Home)