मुंबई : (Love Jihad Akola) अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जमीर काझी नावाच्या एका तरुणाने ‘बादशाह’ नावाने बनावट सोशल मिडिया आयडी तयार करून हरियाणातील एका ११ वर्षांच्या हिंदू मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. तो या मुलीला फूस लावून अकोला येथे घेऊन आला आणि पाच दिवस तिला आपल्या घरात डांबून ठेवले.
मिळालेल्या वृत्तानुसार, आरोपी आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी हरियाणात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मुलीचा भाऊ तिचा शोध घेत अकोल्यापर्यंत पोहोचला आणि पोलिसांच्या मदतीने तिची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपी जमीर काझीला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास 'लव्ह जिहाद'(Love Jihad Akola) आणि फसवणूक अशा सर्व बाजूंनी करत असल्याची माहिती आहे.(Love Jihad Akola)
या घटनेनंतर परिसरात सध्या तणाव निर्माण झाला असून स्थानिक संघटना आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. आरोपी गेमिंग अॅपच्या माध्यमातून आपली ओळख लपवून मुलींना लक्ष्य करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.(Love Jihad Akola)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक